गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
कुलिंग चार्जेसच्या नावावर
जास्तीचे पैसे घेऊन शीतपेय विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट होत आहे. हा प्रकार कायद्याने गुन्हा असून ग्राहकाने तक्रार केल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई होऊ शकते. एक ग्राहक दहा विस रुपयांचा विचार करून तक्रार करीत नाही, मात्र दिवसभरात शीतपेयांची होणारी विक्री पाहता लुटीचा हा आकडा हजार, लाखात जातो. उन्हाळा सुरू झाला की तहानलेले अनेक जीव तृष्णा भागविण्यासाठी शीतपेयांची खरेदी करतात. शीतपेयांच्या
बाटल्यांवर असलेल्या किमतीपेक्षा दहा ते विह रुपये अधिक घेण्याचा सपाटा मंठा शहरात व्यावसायिकांनी लावला आहे. कुलिंग चार्जेस लावल्यामुळे हे दर वाढीव असल्याचं कारण व्यावसायिक पुढे करतात; मात्र छापील किमतीपेक्षा जास्त दराने कोणत्याही वस्तूची विक्री करणं हा दंडनीय गुन्हा आहे.
शीतपेयावर असते ‘टू बी सर्व्हड चिल्ड’ प्रत्यक्षात कुठल्याही पदार्थाचा दर ठरवताना त्याचे उत्पादन मूल्य काढले जाते. त्यानंतर त्याच्या पॅकिंगसह ते ग्राहकापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेचा
अभ्यास केला जातो. सुपर स्टॉकिस्टपासून अगदी छोट्या दुकानदारांना परवडेल याचा सारासार विचार करून किंमत लावली जाते. त्यामुळे शीतपेयांच्या विक्रीतून होणाऱ्या फायद्यातच विजेच्या बिलाचाही
समावेश असतो. अशी टाळता येईल फसवणूक
शीतपेय तयार करणाऱ्या कंपन्यांनी हे पेय थंड स्वरूपातच विक्रीसाठी ठेवावे अशी सूचना ठळकपणे लिहिली आहे. त्यामुळे दुकानदार जेव्हा जादा पैसे मागेल तेव्हा त्याला ही सूचना दाखवावी. हे बघूनही त्यांनी छापील किमतीवर दिले नाही तर
संबंधितांकडून त्याची पावती घ्यावी आणि त्याच्या विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागावी.
Users Today : 32