PM Narendra Modi Rally : नंदूरबारच्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना मोठी ऑफर

Khozmaster
2 Min Read

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात प्रचार सभा सुरु आहेत. आज महाराष्ट्रात नंदूरबार येथे पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केलं. तिसऱ्या टर्ममध्ये गरीबांना अधिक घर देणार असल्याच त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे गट, शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. नकली शिवसेना म्हणत मोदींनी पुन्हा ठाकरे गटावर निशाणा साधला. “नकली शिवेसना मला गाडण्याची भाषा करत आहे. बाळासाहेब ठाकरेंना मी जवळून पाहिलं आहे. बाळासाहेबांना आज किती दु:ख होत असेल” अशा शब्दात मोदींनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. नकली शिवसेना, NCP ने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन बनवलय” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली असली, तरी त्यांना एक ऑफर सुद्धा दिली आहे. “शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘ते आरक्षण कुठल्याही दुसऱ्या धर्माला देऊ देणार नाही’

“मोदी जो पर्यंत जिवंत आहे, तो पर्यंत SC-ST-OBC च आरक्षण कुठल्याही दुसऱ्या धर्माला देऊ देणार नाही. मी हे पूर्ण जबाबदारीने बोलतोय की, वंचितचा जो अधिकार आहे, त्याचे आम्ही चौकीदार आहोत” असं नंदूरबारच्या सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले. “धर्माच्या आधारावर आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या भावनेच्या विरोधात आहे. दलित, मागास, आदिवासी यांचं आरक्षण काढून आपल्या वोटबँकला देण्याचा काँग्रेसचा एजेंडा आहे” असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.

‘मी मंदिरात गेल्यावर काँग्रेसला पोटदुखी’

“विरोधक मला गाडण्याची भाषा करतात. विरोधक जनतेचा विश्वास हरवून बसले आहेत” अशी टीका त्यांनी केली. भारतीयांवर वर्णभेदी टिप्पणी करणारे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्यावर नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. “काँग्रेसचा अजेंड देशासाठी घातक आहे. मी मंदिरात गेल्यावर काँग्रेसला पोटदुखी होते” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *