यांची विराट जनसभा आयोजित करण्यात आली होती. या जनसभेला उपस्थित राहून आदिवासी बांधवांचे सर्वांगीण हित साधायचे असेल तर महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.
पंतप्रधान मोदीजी यांनी कधीही आदिवासी समाजाकडे फक्त व्होट बँक म्हणून पाहिले नाही. ‘सब का साथ सब का विकास’ हे धोरण घेऊन चालताना त्यांनी राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजनेतून आदिवासी बांधवांना घरे मिळाली, महिला भगिनींना घरोघरी शौचालय उभारण्यात आली, उज्ज्वला योजनेद्वारे घरोघरी गॅस मिळाला, जन धन योजनेद्वारे त्यांची बँक अकाउंट उघडली गेली. आदिवासी समजातील भगिनीला राष्ट्रपती पदासारख्या देशातील सर्वोच्च स्थानी विराजमान करण्याचे काम देखील त्यांनी केले.
राज्य शासनाच्या माध्यमातून देखील आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी फेलोशिप दिल्या, दीड लाख विद्यार्थ्यांना दहावीनंतर स्कॉलरशिप, २ लाखांपेक्षा जास्त वनहक्क दावे मान्य केले. त्यामुळे आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मोदीजींनी केले आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी डॉ.हिना गावित यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित, मंत्री अनिल पाटील, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच महायुतीच्या घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नंदुरबार येथील लाखो आदिवासी बांधव भगिनी आवर्जून उपस्थित होते.