गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
दिनांक 11 मे रोजी परतुर तालुक्यातील वरफळ, मापेगाव, रायपूर शिरसगाव, यासह काही गावांना प्रचंड वादळाचा व पावसाचा फटका बसला, या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी, रात्री वादळाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आर डी सी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सूचना देत गावागावात सकाळीच यंत्रणा रवाना करण्याचे आधीच दिली होते, आज सकाळी स्वतः आमदार बबनराव लोणीकर यांनी वरफळ, रायपूर शिरसगाव आदी गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी करत शासन स्तरावरून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषिमंत्री यांच्या माध्यमातून आपदग्रस्तांना मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले
या पाहणी दौऱ्या दरम्यान आमदार लोणीकरांनी वरफळ येथील पडझड झालेली घरे, उध्वस्त झालेली नेट शेड जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन चौकशी केली
दरम्यान वरफळ येथील गावांतर्गत विजेचे 12 खांब पडले असून, वरफळ येथे असलेल्या 33 केवी उपकेंद्र मधील 07 पोल पडल्यामुळे उपकेंद्रावर असलेल्या दहा गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता यासंदर्भात आमदार लोणीकर यांनी तात्काळ भूमिका घेत कार्यकारी अभियंता मठपती यांना घटनास्थळी येण्याच्या सूचना दिल्या व या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले,
झालेल्या चक्रीवादळामुळे वरफळ गावातील अनेकांच्या घरावरची पत्रे उडाली अनेकांचे गोठे नष्ट झाले तर काहीजणांच्या भिंती कोसळल्या तर रायपूर मध्ये हीच परिस्थिती पहावयास मिळाली शेतकऱ्यांच्या शेतातील शेडनेट उडून गेले, काही घरांचे नुकसानी त्या ठिकाणी झाले त्याचबरोबर शिरसगाव येथे विजेचे तीन खांब कोसळले तर काही घरांची पडझड झाली झालेल्या सर्व नुकसानाची आमदार बबनराव लोणीकर यांनी स्वतः जातीने हजर राहून पाहणी करत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या
या वादळाच्या तडाख्यात सापडलेली अनेक फळ पिके उध्वस्त झाल्याचे पहावयास मिळाले
दरम्यान वरफळ येथील साहेबराव रुपनर यांच्या घरावरील थेट कोसळल्याने त्यांच्या पत्नी शारदा साहेबराव रुपनर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली, दर शिरसगाव येथील बद्रीनारायण खरात यांनाही छतावरील दगड कोसळल्याने पायाला तर याच वादळात राहुल शेजुळ हेही जखमी झाले
शिरसगाव जवळील अभय काळुंके या प्रगतीशील शेतकऱ्याची मोठी नर्सरी असून येथे मोठ्या प्रमाणात आंबा झाडांची लागवड करण्यात आलेली आहे या आंब्याच्या झाडावरील हजारो आंबे वादळ आल्या मुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून यासंदर्भात लोणीकरांनी अंबा बगीचा ची संपूर्ण पाहणी करून मदत मिळवून देण्याची आश्वासन दिले
या पार्श्वभूमीवर, आमदार बबनराव लोणीकर यांनी या गावांमध्ये जाऊन आपद ग्रस्तांची अस्थेवाईक पने चौकशी करत धीर देत शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले
या दौऱ्या दरम्यान युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस रमेश भापकर तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपत टकले, पंचायत समिती सदस्य शिवाजी पाईकराव युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बंडू मानवतकर, रमेश चव्हाण,नदीम शेख उपसरपंच जीवन रेंगले, गुलाब सावंत, गोपाल गोरे सतीश कुलकर्णी दत्ता डोईजड, गजानन कुकडे पांडुरंग कुकडे, प्रभाकर जाधव पांडुरंग खरात इंदर बाप्पा जाधव, सुनील खरात स्वप्निल रोडगे अनिल जाधव, संतोष खरात संतोष शेजुळ वीज वितरण चे कार्यकारी अभियंता मठपती,
गटविकास अधिकारी प्रशांत रोहनकर, उपकार्यकारी अभियंता भेंडाले मंडळ अधिकारी पठाण तलाठी श्री लोखंडे श्री वावरे ग्रामसेवक नामदेव काळे कृषी सहाय्यक, शिंदे ग्रामसेवक शेवाळे प्रशांत लाळे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
Users Today : 32