चाकण : पुण्याच्या चाकण एमआयडीसीमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित झालाय. पहिल्या कंपनीने दुसऱ्या कंपनीच्या नावावर 45 एकर जमिनीचा करार करून कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा प्रकार समोर आहे.
जमिनीचा व्यवहार करताना कंपनीने स्वत:च्या फायद्यासाठी एमआयडीसीचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहे. या कंपनीने हजारो स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला आहे.(Chakan MIDC Land Scam News)
सविस्तर माहिती अशी की, 2015 ला लेसो नावाच्या चायनिस कंपनीला चाकण एमआयडीसीने 45 एकर जागा दिली. तिथं 2016 मध्ये त्यांचा करार झाला आणि फॉरेन फंडिंग ही झालं. याद्वारे ती चायनीज कंपनी चाकण परिसरातील हजारो नागरिकांना रोजगार देणार होती. परंतु, करार केल्यानंतर चार वर्षांच्या आत मॅनीफॅक्चरिंग कंपनी सुरू व्हायला हवी, असा नियम असतानाही ती सुरु झाली नाही.
याबाबत माहिती आरटीआय कार्यकर्ते शैलेश मोहिते म्हणाले, तो 45 एकर चा प्लॉट आहे तसाच ठेवला. उलट, चायनाच्या लेसो या कंपनीने चुकीचे सर्क्युलर वापरून ती जागा इतर अॅलमोन्ड कंपनीच्या नावाने वळवली. यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याला आता तेथील स्थानिकांनी विरोध केला असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
स्थानिक नागरिक म्हणाले, मुळात चायनीज कंपनी ‘लेसो’ तिथे आल्यास हजारो लोकांच्या हाताला काम मिळणार होतं,
परंतु आता ते आता मिळणार नाही. कारण, तिथे लॉजिस्टिक कंपनी येणार आहे. म्हणून स्थानिकांनी संबंधित यंत्रणांना
इशारा दिला असून, मूळ कंपनीला 45 एकर जागा परत न दिल्यास मोठा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात कंपनीशी संपर्क झाला नाही. मात्र, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी राठोड यांच्याशी संपर्क साधला
असता निवडणुकीत व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एमआयडीसी जमीन परत घेऊ शकते अस मोबाईल वर सांगत
ह्या कंपनीला स्पेशल परवानगी दिली असल्याची शक्यता आहे असे राठोड यांनी सांगितलं.
विदेशी गुंतवणूक असल्यामुळे चार वर्षात बांधकाम होणे अपेक्षित आहे.
त्यामुळं चाकण एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात हे बघावं लागेल.
पण सध्या तरी ते निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगत प्लॉट देता येतो अस मोबाईल वर प्रतिक्रिया दिली.
परंतु, या सगळ्या प्रकरणात अधिकरी आणि एजंट यांनी मिळून अनेकांचे फायदे करून देत असल्याचे उघड झाले आहे.
नेमके या प्रकरणी आता काय होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
Users Today : 19