पुणे : सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन (Rude Behavior) करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे.
ही घटना सोमवारी (दि.13) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोदीखाना (Modikhana Pune) परिसरातील एका सर्व्हिस सेंटरमध्ये घडली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी (Lashkar Police Station) 48 वर्षीय व्यक्तीवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अशोक बाबाराव खेडेकर (वय-48 रा. कर्वेनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 354, पोक्सो अॅक्ट कलम 7, 8, 11, 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मोदीखाना परिसरातील एका नामांकित कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून काम करते. तर आरोपी त्याच ठिकाणी कामाला आहे.
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी रिसेप्शनीस्टच्या ठिकाणी बसली होती.
त्यावेळी आरोपी तिच्या जवळ आला. त्याने घरच्यांबद्दल विचारणा करु लागला.
घरच्यांची चौकशी करत असताना त्याने मुलीसोबत अश्लील चाळे करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
तसेच तिला जबरदस्तीने किस केला. घाबरलेली तरुणी तेथून वॉशरुममध्ये गेली. ती बाहेर आली असता आरोपीने
पुन्हा तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
याबाबत पीडित मुलीने घरच्यांना सांगितले. तिच्या घरच्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी अशोक खेडेकर याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Users Today : 19