धक्कादायक! बारामतीत प्रेमीयुगुलांना निर्वस्त्र करून लुटले

Khozmaster
1 Min Read

बारामती :  बारामती परिसरातील प्रेमीयुगुलास लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रेमीयुगुलास मरहाण करुन त्यांच्याकडील 90 हजारांचे दागिने लुटण्याची घटना बारामती विमानतळ परिसरात नुकतीच घडली.

प्रेमीयुगुलास लुटल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे निर्वस्त्र करुन छायाचित्रे काढल्याचे उघडकीस आले होते. अशा प्रकारे प्रेमीयुगुलांना लुटण्याची ही तिसरी घटना आहे.

बारामती परिसरातील लुटमारीच्या घटना वाढल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रेमीयुगुलांना धमकी देऊन त्यांना निर्वस्त्र करुन चोरटे त्यांचे मोबाईलवर छायाचित्र काढत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. शुक्रवारी (दि.10) सायंकाळी बारामती विमानतळ परिसरात एका जोडप्याला लुटण्यात आले. त्यांना निर्वस्त्र करुन छायाचित्र काढण्यात आली. त्यांच्याकडील 90 हजारांचे दागिने लुटून चोरटे पसार झाले.

चोरट्यांनी तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी आणि कर्णफुले जबरदस्तीने चोरून नेले. चोरट्यांनी चेहरा कपड्याने झाला होता.याबाबत तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे.
चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यापूर्वी मुंबई येथील एका प्रेमीयुगुलाला लुटल्याची घटना घडली होती.
बारामती शहरात अशा प्रकारच्या घटना घडत असून पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
मात्र, यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.

0 9 3 8 2 4
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *