बावधन येथून चांदणी चौकाकडे जात असलेल्या दुचाकीला टँकरने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 11) दुपारी सव्वा एक वाजता(Hinjawadi) घडला.
ओम सारंग गाडीवान (वय 21, रा. बावधन) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी 44 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकर चालक बाळू दत्तू चव्हाण (वय 42, रा. आडोरा, ता. मानोरा, जि. वाशिम) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची दुचाकी घेऊन ओम गाडीवान हा बावधन येथून चांदणी चौकाकडे येत होता. त्यावेळी पाठीमागून एक टँकर भरधाव वेगात येत दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये ओम गाडीवान याचा) मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
मागच्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात टँकरच्या धडकेमुळे मृत पावलेल्या दुचाकीस्वार आणि पादचारी व्यक्तींच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.
Users Today : 32