काही अधिकारी प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होतात, त्यामध्ये फक्त करिअरचाच मुख्य उद्देश असतो असे नाही. त्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करता येते, त्यांचे प्रश्न सोडवता येतात, खऱ्या अर्थाने न्याय देता येतो आणि त्यातून लोकसेवा करता येऊ शकते. हे ध्येय उराशी बाळगून प्रशासकीय सेवेत येतात. जनतेशी एकरूप होतात. अमोल बनसोडे हे असेच एक अधिकारी. तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या संग्रामपूर तालुक्याची यांच्याकडे चित्र बदलवण्याची ताकद आहे. अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ असे तालुका कृषी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे संग्रामपुर तालुका आदिवासी बहुमोल भाग सारख्या तालुक्याचे कृषी अधिकारी म्हणून ते काम करीत आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये यांनी आपल्या कार्यतत्परतेने त्याची चुणूक दाखवून दिली आहे
यांनी सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून आपली सेवा देत आहे. नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देणारे कर्तव्यदक्ष कृषि अधिकारी म्हणून त्यांची कृषि विभागात ओळख आहे.
त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आजवर सेवा दिली. त्या ठिकाणी थेट बांधावर जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची, त्यांच्या अडी- अडचणी समजून घेण्याची, त्या सोडवण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. कृषि विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या तालुक्यातील प्रत्येक गावात संध्याकाळची सभा तर राज्यभर गाजली. सण असो की उत्सव हा अवलिया शेतकऱ्यांच्या बांधावर असतो. शनिवार किंवा रविवार हे सुद्धा त्यांच्या ते शेतकरी, शेतमजूर व सामाजिक उपक्रमामध्ये व्यतिथत करतात. शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्यचे ते स्वतः समाधान करतात. त्यामुळे त्यांना काही जण एका माणसाचे सैन्य असही म्हणतात. ते कामाप्रति इतके सच्चे आणी इमानदार आहेत की ते स्वतः आठ वाजता कार्यालय उघडतात आणी रात्री सात वाजता स्वतः ते बंद करतात. सर्व कार्यालयाच्या चाव्या त्यांच्या खिशात असतात. सतत शेतकऱ्याचे हीत हेच त्यांच्या डोक्यात असते. जसं माशाला पाण्यात पोहण्याचा कंटाळा येत नाही त्याप्रमाणे हा अवलिया सतत आपल्या कार्यात मग्न असतो. अगदी तालुक्यातील कोणत्याही गावात बनसोडे साहेबांचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे. फारच असे कमी अधिकारी आहेत ज्यांना एवढी अफाट लोकप्रियता मिळाली त्यातले बनसोडे हे अग्रगण्य नाव.थेट गावोगावच्या शेतकरी बांधवांशी थेट संपर्क ठेवल्यामुळे ते शेतकरी वर्गात प्रचंड लोकप्रिय आहेत.
शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पुरवण्याबरोबरच शेतकऱ्यांना कृषि सल्ला देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणारे कृषि अधिकारी म्हणून त्यांची कृषि विभागात विशेष ओळख आहे.या साहेबांच्या आता बदलीबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु आहेत. पण यदा कदाचित बदली झाली तर तालुक्यात उपोषण, मोर्चे, निवेदने हे बदली थांबवण्यासाठी नाही आली तर नवल वाटायला नको.
स्वप्निल देशमुख
Users Today : 82