“वन्यजीव – पर्यावरण संवर्धन काळाची गरज सर्पमित्र साईदास कुसळ”
पुणे प्रतिनिधी ; कर्करोग रुग्णांची सेवा व सुविधा पुरविणाऱ्या अपणा घर पुणे सुलतान सोसायटी कोरेगाव पार्क येथे पुणे जिल्ह्यातील अनुभवी सर्पमित्र म्हणून ओळखले जाणारे साईदास कुसळ व त्यांच्या संपूर्ण टीमने कर्करोग रुग्णसेवा देणारे अपना घर येथे सापांविषयी श्रध्दा अंधश्रद्धा दूर केली. वन्य जीवाचे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे हल्ली सापाची संख्या ही कमी होत आहे त्यामुळे साप हा निसर्गाचा एक मुख्य घटक असून तो निसर्गाचा समतोल राखतो आणि मानवाचा शेतकऱ्याचा मित्र देखील आहे.
भारतामध्ये प्रामुख्याने ५ विषारी जातीचे साप आढळतात. या सापांमध्ये प्रथम येणारा भारतीय नाग, मण्यार, घोणस, फुरसे, आणि चापडा, पोवळा हे प्रामुख्याने ६ सापाच्या विषारी जाती आहेत. त्या भारतामध्ये आढळतात. याव्यतिरिक्त आढळणारे साप हे बिनविषारी असून साप चावल्यास घाबरून न जाता योग्य रित्या उपचार हा त्यावरती केला पाहिजे. कुठलाही अंधश्रद्धेला बळी न पडता यामध्ये कुठल्याही बुवा बाबाकडे किंवा घरेलू उपचार न करता जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन अथवा शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन त्यावरती उपचार घ्यावा असे आव्हान सर्पमित्र साईदास कुसळ , विष्णू पायघन, अनिकेत गायकवाड, विजय राजपूत, विशाल तलसानिया, यांनी पूर्ण टीम ने केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन कुणाल पाटकर, सुरज माळी यांनी केले होते. सापा विषयी जागरूकता निर्माण व्हावी याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मार्केट का सुरज माळी यांनी
कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.दरवर्षी 10 दशलक्ष लोक कर्करोगाने मरतात.
कर्करोगाशी संबंधित 40% पेक्षा जास्त मृत्यू टाळता येऊ शकतात कारण ते धूम्रपान, अल्कोहोल वापरणे, खराब आहार आणि शारीरिक निष्क्रियता यासारख्या बदलण्यायोग्य जोखीम घटकांशी संबंधित आहेत.
कर्करोगाशी संबंधित सर्व मृत्यूंपैकी किमान एक तृतीयांश मृत्यू नियमित तपासणी, आणि लवकर ओळख आणि उपचारांद्वारे रोखले जाऊ शकतात. महिती दिली.
*साप चावल्यास काय करावे ;* विषारी साप ज्या ठिकाणी चावला त्या ठिकाणी जास्त हालचाल करू नये सापाने त्या ठिकाणी चावा घेतला ती जागा स्वच्छ पाण्याने साबणाने धुवून घ्यावी घाबरून न जाता शांततेने ४० ते ५० मिनिटापर्यंत रुग्णालयापर्यंत पोहोचावे. कुठला सापचावला आहे बघाव्यात. अथवा फोटो काढून डॉक्टरांना दाखवण्याचा प्रयत्न करावा.
*साप चावल्यास हे करू नये ;* साप चावल्यास कुठल्याही प्रकारचा मंत्र तंत्र उपचार करू नये कुठल्याही बुवा बाबाकडे जाऊन अंधश्रद्धेला बळी पडू नये साप चावलेल्या ठिकाणी ब्लेड अथवा चाकूने वार करू नये चावलेल्या ठिकाणी तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करू नये तिखट मिरची लिंबाचा पाला हे खाण्याचा प्रयत्न करू नये. त्याच बरोबर घराच्या आसपास कोठेही साप पशू-पक्षी कोणताही वन्यजीव आढळून आल्यास त्याला न मारता जवळच्या प्राणी मित्र यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन निता साईनाथ कुसळ,विष्णू पायघन,अनिकेत गायकवाड, विजय राजपूत,विशाल तसलीम, प्रदिप पट्टेबजदुर या सर्पमित्रांनी केले आहे.
Users Today : 65