मेट्रो स्थानकांवरून नागपूरकरांच्या सायकलींची चोरी, सायकलचोर पोलिसांच्या ताब्यात

Khozmaster
1 Min Read

 नागपूर : गेल्या तीन महिन्यांपासून झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनदरम्यान सायकलचोरीच्या अनेक घटना घडल्या. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये एकच व्यक्ती या सर्व घटनांमध्ये आढळून आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महामेट्रोच्या सुरक्षारक्षकांनी पाळत ठेऊन चोराला पकडले. त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.नागपूरकरांनी मेट्रोनेच प्रवास करावा, यासाठी महामेट्रोकडून प्रोत्साहित करण्यात येते. सायकलने या आणि मेट्रोने प्रवास करा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, सायकलने आलेल्या प्रवाशांच्या सायकल चोरीला जात असल्याच्या घटना अलीकडे वाढल्याचे पुढे आले. महामेट्रोने याची गंभीर दखल घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. सर्व सुरक्षारक्षकांना संशयितांवर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बन्सीनगर मेट्रो स्थानकावर सीसीटीव्हीत व्यक्ती आढळून आली. येथील सुरक्षारक्षक अक्षय तागडे यांनी स्टेशन कंट्रोलर अभिजित ठोकल, सुरक्षारक्षक आणि स्टेशन परिसरातील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने सायकली चोरल्याची कबुली दिली. भगवान दास करिया असे या चोराचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. चोरी केलेल्या सर्व सायकली मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
0 9 3 8 2 4
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *