मालिवाल यांना मारहाण; बिभव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल

Khozmaster
1 Min Read

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सोमवारी केजरीवाल यांचे सहायक बिभव कुमार यांनी आपल्याला लाथा मारल्या आणि सात-आठ वेळा थपडाही लगावल्या, असा आरोप आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.

मालिवाल यांच्या जबाबानुसार गुरुवारी रात्री पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून त्यात आरोपी म्हणून बिभव कुमार यांचे नाव देण्यात आले आहे. तर, मालिवाल यांना पुढे करून केजरीवाल यांना अडकवण्याचा हा भाजपचा कट असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.

मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणप्रकरणी दाखल झालेल्या या एफआयआरमध्ये, बिभव कुमार त्यांना पूर्ण ताकदीने वारंवार मारत असताना त्या मदतीसाठी ओरडत होत्या पण, पुणीही त्यांच्या बचावासाठी आले नाही, असा दावा त्यांनी केला आहे. आज तीस हजारी कोर्टात न्यायदंडाधिकाऱयांसमोर मालिवाल यांनी याच प्रकरणी आपले निवेदनही नोंदवले

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *