शरीरसुखाच्या मागणीस नकार दिल्यामुळे तरुणीवर हल्ला, बारामतीतील धक्कादायक घटना…

Khozmaster
1 Min Read

बारामती: आई वडिलांनी घेतलेले कर्ज व व्याज माफ करण्यासाठी एका १९ वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने या मागणीला विरोध केल्याने तिच्यावर आरोपीने चाकू हल्ला करत तिला जखमी केल्याचा आरोप होत आहे. सदर घटना गुरुवारी, १६ तारखेला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी दत्तात्रय चंद्रकांत कुंभार याला पोलिसांनी अटक करत त्याच्यावर विविध गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय कुंभार (रा. भैय्यावस्ती मळद, ता. बारामती) याने तरुणीच्या आई वडिलांना कर्ज व उचल स्वरुपात काही पैसे दिले होते. दरम्यान, आरोपीने हे पैसे माफ करतो असं म्हणत फिर्यादी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. फिर्यादी तरुणीने आरोपीला नकार दिला. त्यानंतर आरोपीने तरुणीचे तोंड दाबुन त्याच्याजवळ असलेल्या चाकूने तरुणीच्या मानेवर वार केले. तसेच तरुणीच्या पोटामध्ये चाकु खुपसण्याचा प्रयत्न करुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दत्तात्रय कुंभार याच्यावर पोस्कोसह बाल लैंगिक अत्याचार व विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचे उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड करीत आहेत.

0 9 3 8 2 5
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *