आईला मारहाण करतो म्हणून पोटच्या गोळ्याचं धक्कादायक कृत्य, दरवाजा लावून वडिलांना संपवलं

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर : छतावरून पडल्याने जखमी झाले असे कारण सांगत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शवविच्छेदन अहवालात व्यक्तीचा छतावरून पडून मृत्यू झाला नसून हा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वडील दारू पिऊन आईला मारहाण करतो म्हणून मुलानेच चाकूने भोसकून बापाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर इम्तियाज हुसेन यांना पत्नी इरफान फातिमा यांनी तात्काळ घाटी रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांनी डॉक्टरांना इम्तियाज हुसेन हे छतावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाला. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून शविच्छेदन केलं. मात्र अंगावरील जखमा व छतावरून पडल्यामुळे लागलेला मार यामध्ये फरक जाणवला आणि त्यामुळे संशय आला. त्यानंतर हा मृत्यू नसून तर खून असल्याचा प्रकार उघडकीस आला. वडिलांचा मृत्यू झाल्याचा कळताच मुलगा पसार झाला आहे. या प्रकरणी दुय्यम पोलीस निरीक्षक पवन चौधरी तपास करत आहेत.
0 9 3 8 2 5
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *