परभणी हादरली! आईवडिलांनी मुलीचा घोटला गळा, रात्रीच जाळला मृतदेह

Khozmaster
2 Min Read

  परभणी जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत आंतरजातीय प्रेमविवाहासाठी हट्ट धरल्याने एका 19 वर्षीय तरूणीचा तिच्याच आईवडिलांनी गळा घोटून हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या हत्येनंतर ही घटना दाबण्यासाठी आई वडिलांनी भावकीतील काही जणांची मदत घेऊन तिचा मृतदहे स्मशानभूमीत जाळला होता. आता ही घटना उघडकीस आल्यानंतर परभणीत खळबळ माजली आहे.  परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हामध्ये ही घटना घडली आहे. या गावातील 19 वर्षीय तरूणीचे गावातील इतर जातीतील तरूणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून दोघे आंतरजातीय प्रेमविवाह करणार होते. मात्र या प्रेमविवाहाला तरूणीच्या कुटुंबियांचा विरोध होता. मुलीच्या आईवडिलांनी तिला अनेक वेळा समजावण्याचाही प्रयत्न केला होता.मात्र तरूणी आंतरजातीय विवाहावर ठाम होती.

अखेर मुलीच्या या हट्टाला कंटाळून आईवडिलांनी तिच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार आईवडिलांनी 21 एप्रिल  2024 च्या रात्री मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्याच रात्री भावकीतील काही निवडक व्यक्तींना सोबत घेऊन आईवडिलांनी मुलीचा मृतदेह न्हावा येथील स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट केला होता.दरम्यान गुप्त बातमीदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर ही घटना उघडकीस आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता ऑनर किलिंगचा हा गुन्हा उघडकीस आला. त्यानुसार पोलिसांना या प्रकरणी आरोपी वडील बालासाहेब भीमराव बाबर, आई रूक्मिणीबाई बालासाहेब बाबर, अच्युत दत्तराव बाबर, राजेभाऊ रखमाजी बाबर, अशोक रूस्तमराव बाबर, आबासाहेब रूस्तमराव बाबर, गंगाधर योगाजी बाबर, गोपाळ अशोक बाबर यांच्याविरूद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील करत आहेत.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *