सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांची पाण्यासाठी भटकंती

Khozmaster
2 Min Read
सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांची जिल्हाधिकारी कडे तक्रार
अकोला प्रती – सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक वार्डात आर ओ मशीन लावली आहे. परंतु कित्येक दिवसापासून हे आर ओ मशीन बंद पडल्या आहेत.शासकीय सर्वोपचार रुग्णालयात  पाणीटंचाईमुळे रुग्ण व नातेवाइकांचे हाल होत आहेत.तापमानाने चाळिशी पार केलेली असताना सर्वोपचार रुग्णालयातील पाणीबाणीमुळे विकतच्या पाण्यावर झुंबड उडत आहे.दररोज येणारे रुग्ण, आंतररुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण, रुग्णांसोबतचे नातेवाईक यांना पिण्याच्या पाण्यासाठी  तपत्या उन्हात वणवण भंटकती करावी लागत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाणी विकत आणावे लागत आहे. तर सर्वोपचार रुग्णालयात काही समाज सेवकाकडुन मोफत पाणी वाटण्यात येते. पिण्यासाठी पाणी मिळावे त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची झुंबळ उडते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भंटकती करावी लागत असुन त्यांची ही पायपीट त्वरित थांबवावी. या आर ओ मशीन कीती दिवसापासून बंद आहेत,तरी काही आर ओ मशिन चे नळ सुध्दा नाही आहेत.या पाणी प्रकरणाकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये हे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असून ह्या बंद आर ओ मशिन त्वरित दुरुस्ती करून रुग्णाची व त्यांच्या नातेवाईकांनची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केलेल्या तक्रारी द्वारा केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक समिर खान, अब्दुल कादर, सुरज खंडारे, सिध्दांत वानखडे, अमोल इंगोले इत्यादी नागरिक उपस्थित होते.
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *