पहूरला लोकसहभागातून उभे राहतेय नागेश्वर महादेवाचे देऊळ

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर , ता . जामनेर ( ता . १९ ) मंदिरांचे गाव म्हणून ओळख होवू पाहणाऱ्या पहूर गावात लोकसहभागातून भगवान नागेश्वर महादेवाचे देऊळ उभारले जात आहे .
       १९८५ मध्ये लेलेनगरात दादासाहेब  कॅप्टन डॉ . एम . आर . लेले यांच्या सहकार्याने शिवभक्त रंगनाथ महाराज ,  स्वर्गीय नामदेव घोंगडे , स्वर्गीय नामदेव उबाळे , स्वर्गीय अनंत सोनार गुरुजी , स्वर्गीय  सखाराम  घोंगडे , स्वर्गीय अर्जुन उखा घोंगडे , सुधाकर चौधरी , हभप गजानन महाराज , सरुबाई फुलपगारे , मथुराबाई सोनवणे , वत्सलाबाई चिमकर , कस्तुराबाई देशमुख  आदी भाविकांनी पुढाकार घेत गावकऱ्यांच्या दातृत्वातून श्री क्षेत्र हनुमान मंदिराची उभारणी केली . याच श्री क्षेत्र हनुमान मंदिराच्या माध्यमातून या मंदिराशेजारीच नागेश्वर महादेवाचे टुमदार मंदिर उभारले जात असून भाविकांचे मोठे सहकार्य लाभत आहे . पश्चिम मुखी असलेले हे नागेश्वर महादेवाचे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ येथील नागेश्वर महादेव मंदिराची  प्रतिकृती असल्याचे ज्ञानेश्वर चौथे यांनी सांगितले .
    श्रीक्षेत्र हनुमान मंदिरातर्फे आगामी वर्षात रौप्य महोत्सवी किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून नागेश्वर महादेव मंदिराच्या उभारणीत अधिकाधिक भाविकांनी आपले योगदान देण्याचे आवाहन श्री . क्षेत्र हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय बनकर , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चौथे , सचिव विशाल चव्हाण , विश्वस्त दिपक जाधव यांच्यासह विश्वस्त मंडळाने केले आहे . लेलेनगर येथील तरूण मित्रमंडळ व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत .
0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *