चिखली येथे दिनांक: ३१ मे रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होईल प्रदान
सोयगाव प्रतिनिधी
गोकुळसिंग राजपूत
सिल्लोड तालुक्याचे पत्रकारिता क्षेत्रातील एक नाव “दैनिक माझा मराठवाडा व साप्ताहिक आपले ज्ञानपंख व ज्ञानपंख 24 न्यूजचे मुख्य संपादक दशरथ एन सुरडकर यांना ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, सुलोचना माहेरघर (महिला आश्रम), लताई बाल अनाथालय, भोकर ता. चिखली जि. बुलढाणा यांच्या कडून सन २०२४ चा “राज्यस्तरीय बहुजन रत्न”हा पुरस्कार जाहीर झाला असून तो पुरस्कार दिनांक ३१/०५/२०२४ रोजी पंचशील बुद्ध विहार, गजानन नगर
चिखली जि बुलढाणा येथे
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजक तथा तथा अध्यक्ष लता अविनाश डोंगरदिवे यांनी निवड पत्राद्वारे कळविले आहे.
पत्रकार दशरथ सुरडकर यांनी ख-या अर्थाने पत्रकारिता क्षेत्रात निभिॅड व रोखठोक पत्रकारिता केली आणि आजही करत आहे.
सध्या ते सिल्लोड येथे राहत असून त्यांनी “साप्ताहिक आपले ज्ञानपंख,दैनिक माझा मराठवाडा हे वृत्तपत्र व ज्ञानपंख:24NEWS चॅनल सुरु करुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अल्पावधीत त्यांनी विद्रोही व निर्भिड संपादक म्हणून आपली ओळख निर्माण केली.
हा ध्येयवेडा पत्रकार नेहमीच आपल्या निर्भिड लेखणीतून शेतकरी व कष्टकरी, शोषित पीडित समाजाचे व नागरिकांचे प्रश्न व समस्या आपल्या वृत्तपत्रात मांडुन
शासनास दखल घेण्यात भाग पाडलेले आहे.
त्यांनी खरोखरचं सिल्लोडसह औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांनी स्वतः ची ओळख निर्माण केली आहे. म्हणून त्यांना
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट असा “राज्यस्तरीय बहुजन रत्न हा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
हा पुरस्कार मिळाल्याने परिसरात व तालुक्यात त्यांचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे.
Users Today : 12