छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
भारतात बुद्धीमान, ज्ञानी प्रामाणिक लोक खूप आहेत.पण कमी आहे हिंमतीची.कारण भय माणसाला कमजोर बनवते.सापाला दोरी समजून पळ काढणारे जास्त आहेत.काही तर कायम भीक मागतात.घर पाहिजे, संडास पाहिजे, धान्य पाहिजे, अनुदान पाहिजे,साडी पाहिजे.त्यांचा उपयोग फक्त डोकी मोजण्यासाठी होतो.ते देशाचे असतात.देश त्यांचा नसतो.
ईव्हीएम विरोधात देशभरातून खूप मोठा लढा चालू आहे.काहींचा राजकीय सभांमधून,काहींचा न्यायालयात.काहींचा निवडणूक आयोग कडे.लोक लढत आहेत.पण यात न्यायाधीश आणि निवडणूक आयोग हे सरकारचे पेड सर्व्हंट आहेत.ते सरकार सांगते तसेच करतात.
या परिस्थितीत मोदी कोणाचेही ऐकायला तयार नाहीत.ते आजपासून हुकुमशाहा बनलेले आहेत.तरी पण निवडणूक होते तोपर्यंत यावर इलाज केला जाऊ शकतो.निवडणुका बंद केल्या तर हाही इलाज संपतो.
जेंव्हा जेंव्हा निवडणूक येते तेंव्हा राजकारणात नसलेल्या लोकांनी आपली प्रचार मोहिम काढली पाहिजे.जशी निखील वागळे, विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांनी काढली.हे तीन ही माणसे राजकिय पदाधिकारी नाहीत.आमदार खासदार नाहीत.तरीपण यांनी मोदी आणि हुकुमशाही विरोधात चांगली मोहिम काढली.त्यांना जमेल ते काम त्यांनी केले.लोकांनी प्रतिसाद चांगला दिला.भाजप ने अडवणूक केली,हाणामारी केली.तरीही यांनी जुमानले नाही.शेवटी शेवटी तर शिवसेनेच्या राजकीय व्यासपीठावर येऊन भाषणे दिलीत.खूप चांगले काम केले.नक्कीच याचा चांगला परिणाम झाला.होईलच.तीन माणसांनी महाराष्ट्र पिंजून काढला.लाखोंची हिंमत वाढवली.अशी शंभर माणसे बाहेर पडली तर करोडोंची हिंमत वाढवू शकतात.असे करोडो हुकुमशाही विरोधात गेले तर सरकारची नक्कीच फाटते.
असा प्रयोग आधी महात्मा गांधी यांनी १९४२मधे केला होता.खूप चांगला परिणाम झाला.इंग्लंड मधील १९४५ लोकसभा निवडणुकीत लेबर पक्षाचे उमेदवार जॉन एटली यांनी तर जाहीर केले कि, आम्ही सत्तेवर आलो तर भारताला स्वातंत्र्य देऊ.आणि आले ते सत्तेवर.स्वातंत्र्याची कृती सुरू केली होती.पुर्ण केली.
असाच प्रयोग १९७५, १९७६,१९७७ मधे जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी विरोधात केला होता.संपुर्ण भारत पेटला.इंदिरा गांधींना हार मानावी लागली.जे अलाहाबाद हायकोर्टाला नमले नाहीत ते जयप्रकाश नारायण यांच्यापुढे नमले.
असाच प्रयोग १९१२ ते १९१४आण्णा हजारे यांनी केला . मंत्र्यांच्या भ्रष्टाचार वर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकपाल ची मागणी केली.भारतभर आंदोलन पेटले.विशेष लोकसभा अधिवेशन बोलवले.मागणी मान्य केली.जरी ती पुर्ण अमलात आणली गेली नाही.पण कांग्रेस सरकार पडले.
आता याच दिशेने केजरीवाल जात आहेत.म्हणे दोन चार लोकांना काय जेलमध्ये टाकतात आम्ही हजारो लोक जेलमध्ये येतो.खूप चांगले धाडस करीत आहेत.येथे मोदी हारतील.नमतील.नक्कीच.लढायला तितके आत्मबळ पाहिजे.उगाच कोणी छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप, महात्मा गांधी , जयप्रकाश नारायण,आण्णा हजारे पुजले जात नाहीत.
आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच आधी आण्णा हजारे सोबत कांग्रेस विरोधात म्हणजे भ्रष्टाचार विरोधात लढ्यात सहभागी झालो.आता भाजपच्या हुकुमशाही विरोधात निवडणूक प्रचारात मोदी विरोधात मोहीम काढली होती.सत्ता बदलात आमचा खारीचा वाटा आहेच.जरी सत्तेत वाटा नसला तरीसुद्धा.कारण आम्ही लोकशाहीचे पुजारी आहोत.जो मातला त्यांच्या विरोधात लढणारी वानर सेना आहोत.मातला त्यावर मुतला.
नागरिकांनी कलेक्टर, राज्यपाल, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट यांच्या फंदात पडून वेळ वाया घालवू नये.हे सरकारचे नोकर आहेत.ते कधी इंग्रजांशी एकनिष्ठ होते.ते कधी कांग्रेस शी एकनिष्ठ होते.ते आता भाजपशी एकनिष्ठ आहेत.ते सत्तेशी एकनिष्ठ असतात.उद्या भारतावर पुन्हा अमेरिका,रशिया,चीन चे राज्य आले तरी हे नोकर त्यांची गुलामी करतील.म्हणून त्यांचेवर विसंबून लोकशाही चालणार नाही.नोकर म्हणजे देशाला लागलेली उदळी.देश पोखरून काढते.
तात्पर्य,आपण राजकीय पदाधिकारी असाल तर निवडणूक प्रक्रियेतून चोरांना ,सैतानाला विरोध करा.जर राजकीय पदाधिकारी नसाल तर वैचारिक भुमिका घेऊन जन जागृती करा.महाराष्ट्र जागृत जनमंच याच दिशेने काम करीत आहे.आम्ही वैचारिक आहोत.आम्ही कृतीशील आहोत.आम्ही परिणामकारक आहोत.कारण आम्ही त्या त्या काळात जगणारी आणि जागवणारी माणसे आहोत.
Users Today : 12