देखभाल नाही . . . दुरुस्ती नाही खर्च मात्र २ लाख ९९ हजार

Khozmaster
2 Min Read
‘तो ‘ रंगमंच विठ्ठल मंदिराला देण्यासाठी झाले होते पूजन
. . . पण कोठे घोडे अडले ?
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर , ता . जामनेर ( ता . १७ )
जामनेर तालुक्यातील वाघूर नदीच्या तीरावर समर्थ विठ्ठल मंदिराच्या मागे असलेला ‘ तो ‘रंगमंच समर्थ विठ्ठल मंदिराला देण्यासाठी पूजन झाले होते मात्र कोठे घोडे अडले ?
  पहूर कसबे येथे वार्ड नंबर ३ मध्ये सन २०११ मध्ये हा रंगमंच मंजूर झाला होता . २०१२ मध्ये सुमारे ३ लाख ५०हजार रुपये खर्चून त्याची उभारणी करण्यात आली . मात्र आज पावेतो येथे कोणताही सांस्कृतिक किंवा धार्मिक  कार्यक्रम झालेला नाही . जाणकारांच्या  सांगीतल्या प्रमाणे या रंगमंचावर घाणीचे साम्राज्य होते . आता मात्र त्याचा चक्क गोठा म्हणूनच वापर होत आहे .
देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून २०१८ मध्ये चौदाव्या वित्त आयोगातून पुन्हा २ लाख ९९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे ग्रामपंचायतीच्या दप्तरी नमूद आहे .
नेमकी कोणती देखभाल आणि कोणती दुरुस्ती केली ? हे मात्र अनाकलनीय कोडे आहे .
समर्थ विठ्ठल मंदिराला हा रंगमंच  मिळण्यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे . ग्रामपंचायतीने सदर रंगमंच मंदिराला देण्यास हिरवा कंदिल दाखविला आहे . ग्रामपंचायतीने ‘तो ‘रंगमंच वापरासाठी मंदिराला दिला असेल तर नेमके  कोठे घोडे अडले आहे ? अशा संतप्त भावना टाळकरी भजनी मंडळी व्यक्त करीत आहेत .
       रंगमंच प्रकरणी चौकशी करून सरकारी पैश्यांचा चुराडा होण्यास कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त पहूरकर ग्रामस्थ करीत आहेत .
0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *