इमारत ताब्यात घेणेबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ गितेश चावडा यांनी केले कानावर हात

Khozmaster
4 Min Read
पत्राच्या खोलीत रुग्णांचे हाल कोटी रुपये खर्च करून काय उपयोग
गोकुळसिंग राजपुत
सोयगांव प्रतिनिधी
सोयगांव तालुक्यातील सावळदबारा येथील  आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र पाच ते सहा वर्षांपासुन पुर्ण झालेले असल्यावर सुद्धा सोयगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ गितेश चावडा मात्र ताब्यात घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे.विशेष म्हणजे सावळदबाराचा पदभार त्याच्याकडे असून हे महाशय एखाद्या दोन महिन्यांत इकडे फिरकून बघत असतात मात्र इतर दिवस या आरोग्य केंद्राला वाऱ्यावर सोडलेले असते.
नव्यानेच बांधलेल्या आयुष्यमान भारत आरोग्य वधिॅनी धुळखात पडुन असुन या आरोग्य केंद्रामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन त्यात गावातील मोकाट कुत्रे रहिवास करुन राहत असुन शासन प्रशासन यांच या प्रकरणाकडे पुर्णपणे दुर्लक्ष असून
सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी
 डॉ गितेश चावडा यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.
सावळदबारा येथे आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्राच्या इमारतीच्या बांधकामावरती शासनाने कोठ्यवधी रुपय खर्च करुन हे  आरोग्य केंद्र आज ही धुळखात पडुन आहे या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे व बोगस काम झालेले असुन ही इमारत ताब्यात घेणे अगोदरच भिंतीला मोठ मोठे तढे गेलेले आहे त्यात काही ठिकाणी तर पाईप फुटलेले आढळुन आले तर काही ठिकाणी खिडक्या दरवाज्यांच्या काचा फुटलेल्या असुन ही इमारत चालू नसल्याने भंगार अवस्थेमध्ये अंधारामध्ये  धुळखात पडुन आहे.  सावळदबारा हे अठरा गावांचे केंद्र असुन हे आरोग्य केंद्र एक पडक्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोलीमध्ये चालविले जात आहे त्या खोलीमधे औषधी साठा आणि इतर साहित्य ठेवायला जागा शिल्लक उरलेली नसुन रुग्णाचा उपचार करायचा कुठ हा मोठा प्रश्न येथील डाॕक्टर आणि कर्मचा-यांना पडलेला आहे  आरोग्य केंद्र चालविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे आशासेविका यांची मिटींग  पडक्या छताखाली घेतली जात आहे यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते हे मात्र नाकारता येत नाही या
ठिकाणी 8 कर्मचारी रुजु असुन 18 कर्मचारी रिक्त पदे असुन तीन वैद्यकीय अधिकारी यांची पोस्ट असुन हजर फक्त एकच वैद्यकीय अधिकारी असल्याची ही माहिती समोर आलेली आहे
कोठ्यावधी रुपयांच्या इमारतीचे काम नित्कृष्ट दर्जाचे व अपुर्ण काम करुन ठेकेदाराने वरती हात करुन पळ काढलेला आहे.
डोंगराळ व आदिवासी बहुल भागाकडे जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर दुर्लक्ष आहे. दुसरे सर्जन उपलब्ध करून न देता हेतुपुरस्सर स्वतःच सावळदबारा येथील पदभार सोडून इतरत्र फिरतात तर त्यांनी सावळदबार केंद्राचा पदभार स्विकारलाच कशाला? अशा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.या बेजबाबदार आरोग्य अधिकारी डॉ गितेश चावडा वैद्यकीय अधिकारी यांच्या बेजबाबदार पणाला नेमके कोण दोषी आहे असा प्रश्न जनतेला भासावत असल्याचे दैनिक माझा मराठवाडा विभागिय संपादक गोकुळसिंग राजपूत यांनी बोलताना दिली.
इमारत ताब्यात घेण्यास झाला उशीर
डॉ गितेश चावडा यांनी सांगितले की त्यांने जर दोन दिवसांत लाईटचे काम नाही केले तर ब्लाॅक लिस्टमध्ये टाकून नवीन ठेकेदाराला काम देऊ तसेच आम्ही कनिष्ठ अभियंता यांना लाईटचे काम तातडीने पूर्ण करुन घेऊ असे दि.१२/४/२४ ला सांगितले होते पूर्ण महिना उलटला आहे.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मराठवाडा विभागिय सरचिटणीस गोकुळसिंग राजपूत यांच्याशी डॉ गितेश चावडा यांनी सांगितले होते.असे बोलणे होऊन एक महिना उलटून गेला आहे.मे महिना असल्याने उष्णताचे तापमान खूप वाढले आहे.आणि रुग्णांना सेवा दिल्या जाते साध्या पत्राच्या खोलीत व आरोग्य अधिकारी डॉ गितेश चावडा हे दवाखाना ताब्यात घेण्यास कानावर हात ठेवून चुप बसले आहे.
 नवीन दवाखाना सुरू होईल अशी आशा रुग्णांना आहे.खरोखरच रुग्णांचे यांचे जागे अभावी हाल होत आहेत.
0 9 4 6 5 7
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *