जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथील मातंग ऋषी प्रबोधन सेवाभावी ट्रस्टच्या वतीने संगीतमय शिव महापुराण कथा आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या उत्साहात सुरुवात झाली . हिवरा ( ता .मुक्ताईनगर ) येथील उखा महाराज शिव महापुराण कथेचे प्रवक्ते असून त्यांच्या श्रवणीय कथेचा भाविक आनंद घेत आहेत .
पहूर कसबे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात कथेचे आयोजन करण्यात आले आहे .
ह भ प राजगुरू महाराज यांच्या प्रेरणेने गेल्या दहा वर्षांपासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सुरु आहे .
सप्ताह दरम्यान ह भ प नेहा ताई महाराज , सोनारी , ह भ प संजीवनी ताई महाराज , हळदा . ह भ प स्नेहल दीदी महाराज पाचोरा , ह भ प जान्हवी दीदी महाराज , सोयगाव सोनवणे सोयगाव , ह भ प स्नेहल दीदी महाराज थोरात , पळसखेडा , ह भ प ज्ञानेश्वरीताई महाराज चाळीसगाव , ह भ प सुनीताताई महाराज पाटील यांचे कीर्तन होत असून २३ मे रोजी सकाळी १० वाजता ह भ प उखाजी महाराज यांचे काल्याची कीर्तन होणार आहे . महाप्रसादाने शिव महापुराण कथा व कीर्तन सप्ताहाची सांगता होणार असून भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन राजगुरू महाराज यांनी केले आहे .
यशस्वीतेसाठी ओंकार महाराज इंगळे ,मलकापूर , गायनाचार्य ह भ प गयाबाई महाराज सरकटे ओझर , संजीवनी ताई महाराज हळदा , रवींद्र महाराज भोलानकर , मलकापूर , दिलीप महाराज पहूर यांच्या सह ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे .
Users Today : 7