बाईची कारवाई छान,पण जिवावर बेतली ओढताण

Khozmaster
13 Min Read

रेतीमाफिया चे रावणराज ; मिडियाला फोटो काढण्यास मज्जाव, तहसीलदारच्या चालकाला अश्लील शिवीगाळ

कार्यालय, प्रतिनिधी – महाराष्ट्रातील बुलढाणा, जालना जिल्ह्यात अवैध रेती माफी यांचा हौदोष सुरू झाला आहे. रात्रंदिवस सुरू असलेल्या या नदीपात्रामधून अवैध रेती वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक , जीवित हानी होत आहे. प्रतिदिन लाखो रुपये कमावणाऱ्या या अवैधरितिमाफियांचे मनोबल प्रचंड उंचावले आहे महसूल तसेच पोलीस प्रशासन यांचे पाठबळ लाभल्याने रितीमाफिया महसूल विभाग तसेच पत्रकारांना सुद्धा जुमानत नसल्याचे चित्र 19 मे रोजी मंठा तहसीलदार वैशाली जोंधळे मॅडम यांच्या कारवाईदरम्यान बघावयास मिळाले.

                याबाबत महसूल विभागातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मंठा तालुक्यामधून टाकळखोपा कानडी सवडद व इतर काही रेती घाटामधून शासनाच्या घरकुल बांधणी करिता गोरगरीब जनतेला रेती उपलब्ध करून देणे या उपक्रमाला वेगळेच रूप दिले जात आहे. प्रतिदिन शेकडो टिप्पर मधून लाखो ब्रास विनापरवाना रेती वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारच्या वाहनावर कार्यवाही करण्याचा धडाका मंठा तहसीलदार वैशाली जोंधळे मॅडम यांनी सुरू केला आहे मागील दोन महिन्यात 83 वाहनावर दंडात्मक कारवाई करून रेती माफ यावर अंकुश कसण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. असे असताना 19 मे रोजी चार ब्रास वाहनाचा पाठलाग करत असताना लोणार पोलीस स्टेशन ,महसूल हद्दीमध्ये त्यांनी वाहनावर दंडात्मक कारवाईसाठी अवैधरीती वाहतूक करणारे वाहन क्रमांक. एम.एच.21एच.4008

 थांबवले असता रेतीमाफी यांचे धाबे दणाणले महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार रेतीमाफी यांनी सुरू केला त्यांचे कार्यक्षेत्र त्यांचे अधिकार तसेच इतर नियमावली बाबत महसूल अधिकाऱ्यांची कोंडी करण्यास त्यांना अरेरावीची भाषाबोलून शिवीगाळ करून मारहाण करण्यापर्यंत रेतीमाफी यांनी अतोनात प्रयत्न केले. दरम्यान तहसीलदार जोंधळे मॅडम यांनी लोणार पोलीस स्टेशन यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला तसेच लोणार तहसीलदार यांना सुद्धा संपर्क करून यथोचित प्रकार सांगितला. परंतु उभय डिपार्टमेंटने तात्काळ कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे घटनास्थळावर परिस्थिती हाताबाहेर क्षणोक्षणी जात होती. हा सगळा प्रकार सर्वसामान्य नागरिक निमटपणे बघत होते रेती माफीयांची ही दबंगगिरी वाढत चालली आहे .महसूल, पोलिसांची त्यांना कोणतीही तमा नाही. यामुळेच 19 मे रोजी तहसीलदार मॅडम यांच्या चालकाला अश्लील शिवीगाळ देत रेतीमाफी याने त्याला मारहाण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु घटनास्थळी उपस्थित जमावाने यामध्ये हस्तक्षेप करत हा गैरप्रकार आटोक्यात आणला. हा सगळा घटनाक्रम सुरू असताना खोज मास्टर टीम तिथे उपस्थित होती, यावेळी लोणारचे अनेक पत्रकार सुद्धा तेथे उपस्थित झाले. दोन दिवसापूर्वी फेसबुक वर लोणार रेतीचा पोल-खोल करत असताना खोज मास्टर च्या पेजवरून काही टिप्पर अवैध रेती वाहतूक करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल केले .त्याचाच राग मनात ठेवत रेतीमाफी यातील एका भामट्याने खोज मास्टर टीमला फोटो व्हिडिओ काढण्यास मज्जाव केला. तेथील तहसीलदार समक्ष उद्धट बोलण्याची भाषा सुद्धा वापरली परंतु खोज मास्टर अशा भामट्या रेतीमाफीया अथवा कुठलाही माफीया असो त्यांच्या धमकीना भीक घालत नाही. त्यामुळे घटनास्थळावर तटस्थ राहून व्हिडिओ तथा फोटो चित्रीकरण खोज मास्टर टीमच्या वतीने करण्यात आले. तेथील घडलेला इतंभूत घटनाक्रम हा खोज मास्टर च्या तिसऱ्या डोळ्यांमध्ये चित्रीकरण करण्यात आलेला आहे. मंठा तहसीलदार जोंधळे मॅडम यांनी कॉल केल्यानंतर दोन तासांनी लोणार महसूल विभागाच्या वतीने त्यांना सहकार्य करण्यात आले, औपचारिक रित्या लोणार पोलिसांचे वाहन तेथे येऊन जमावाला कोणत्याही सूचना न देता तसेच परत गेले. तहसीलदार जोंधळे मॅडम यांच्या सांगण्यानुसार मागील काळात त्यांनी अशा प्रकारे लोणार तहसील अंतर्गत कारवाई केली होती, त्या वाहनाला कोणतीही दंडात्मक कारवाई न करता लोणार पोलीस स्टेशनच्या वतीने सुपुर्दनाम्यावर सोडण्यात आले होते . अर्थातच त्या वाहनाचा पंचनामा ईतमभूत कारवाई पद्धती सुरू असून त्या वाहनावर बोजा चढवण्याचे काम सुद्धा करण्यात येणार आहे अशा प्रकारची ग्वाही यावेळी तहसीलदार जोंधळे मॅडम यांनी दिली .परंतु त्यांच्या या प्रश्नामुळे लोणार महसूल विभाग तसेच पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निश्चितच निर्माण झाला आहे. 19 मे च्या घटना क्रमामध्ये लोणार तहसील आणि पोलीस विभागाची कार्यक्षमता सुद्धा संशयास्पदच आहे. लोक चर्चेनुसार लोणार तहसील प्रत्येक टिप्पर कडून तीस हजार रुपये प्रतिमाह हप्ता दिला जातो , अशा प्रकारच्या 100 च्या वर टिप्पर या रेती घाटामधून रात्रंदिवस सुरू असतात. यावरून सर्वसामान्य जनता दोन्ही विभागाची कार्यक्षमतेची चाचपणी करू शकते.

             मंठा येथून 50 किलोमीटर अंतरावर महसूल विभाग मंठा यांची कारवाई केली जाते परंतु आठ किलोमीटरच्या अंतरावर लोणार महसूल मात्र कारवाई करण्यात अपयशी ठरते. लोणार शहरांमधून सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीच्या टिप्पर पोलिस आणि महसूल विभागातला नाममात्र दिसत नसल्याचा खेद लोणारवासीयाकडून वर्तवला जात आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परला नंबर प्लेट नाही, अनेक टिप्पर चे फिटनेस, पियूसी, इन्शुरन्स नाही.काही वाहन चालकाकडे तर वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नाही यामुळे मागील काळात अनेक अपघात झाले असून पाच लोकांचे निष्पाप बळी गेले आहेत. तरीसुद्धा या रतीमाफी यांचा बोलबाला सरास सुरू आहे. त्यांच्या दबंगगिरी तसेच अर्थकारणामुळे लोणार तहसील आणि पोलीस विभाग नतमस्तक झाले असल्याची सुद्धा चित्र बघावयास मिळत आहे.

जोंधळे मॅडम यांची कार्यवाही संशयास्पद

         मंठा महसूल अंतर्गत तहसीलदार जोंधळे मॅडम यांनी मागील दोन महिन्यात 83 वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. लाखो रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करून दिला आहे अर्थातच याबाबत त्यांची कारवाई प्रशंसनीय आहे. परंतु दिवसभरात शेकडो टिप्पर जात असताना काही मोजक्या वाहनावरच कारवाई जोंधळे मॅडम यांच्या पथकाकडून करण्यात येते. कार्यवाही होत असताना मात्र रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे वाहन आढळून येत नाही म्हणजेच काही लोकांना टार्गेट करूनच ही कारवाई करण्यात येत आहे ,अशा प्रकारची प्रतिक्रिया अनेक रिती वाहतूक करणाऱ्या टिप्पर मालकांनी दिली आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष रेती घाटावर दंडात्मक कारवाई झाली तर वाहन चालकांचा पाठलाग करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची तसेच अपमानित होण्याची नामुष्की महसूल विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर येणार नाही. 19 मे रोजी घडलेला चित्तथरारक प्रसंग हा कधीकाळी अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतू शकतो, तसेच लोक चर्चेनुसार काही वाहन चालकांना या भरारी पथकामध्ये असलेल्या महसूल खबरी कडून सावधानी बाळगण्याचा तसेच जोंधळे मॅडम रोडवर येत असल्याचा गर्भित इशारा सुद्धा दिला जातो. त्यामुळे होत असलेली कारवाई निश्चितच संभ्रम आहे. वरिष्ठाच्या आदेशाचा अनादर करणे म्हणजेच शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जाणे आहे. प्राप्त माहितीनुसार जोंधळे मॅडम वरिष्ठाच्या सूचनेचा अनादर करीत असल्याची शंका सुद्धा नागरिक वर्तवित आहेत. 

 

      लोणार महसूल विभागाची बघायची भूमिका चर्चेचा विषय ठरलेली आहे. मंठा तहसीलदार लोणार हद्दीमध्ये येऊन कारवाई करतात परंतु स्थानिक लोणार महसूल पथक मात्र थातूरमातूर दोन तीन कारवाई करून नामा निराळे राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात आहे. याप्रकरणी गैरजबाबदार असलेल्या महसूल अधिकाऱ्यासह मंडळ अधिकारी तलाठी यांना नोटीस बजावून त्यांना अवैध रेती वाहतूक प्रकरणात स्पष्टीकरण मागविण्याचे आदेश बुलढाणा जिल्हा अधिकारी यांनी देणे अनिवार्य आहे अशा प्रकारची मागणी जनसामान्यातून होत आहे. लोणार मंठा महसूल अंतर्गत उद्भवलेल्या आव्हान मुळे शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात आहे. अवैध गौण खनिज चोरी प्रकरणी लोणार मंठा महसूलची संयुक्त कारवाई करण्याची योजना तसेच महसूल विभागाला लोणार मंठा पोलिसांचे संरक्षण देण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संगणमत करून पुढील योजनाबद्ध कारवाई पथक नेमत नाकाबंदी केल्यास रेतीमाफी यावर निश्चित आळा बसेल.

आरटीओ विभाग निद्रिस्त 

जिल्ह्याभरात वर्तमानपत्रात सुरू असलेल्या अनेक अपघाताची मालिका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर कडून रात्रंदिवस सुरू आहे. लोकांचा निष्पाप बळी जात असताना बुलढाणा आरटीओ विभाग मात्र निद्रिस्त झालेला आहे. विना नंबर प्लेट पीयूसी इन्शुरन्स समाप्ती अनेक वाहन चालकांचा परवाना नाही असे असताना सुद्धा रात्रंदिवस हायवासारख्या अवजड वाहनांमधून रेती वाहतूक करत भीषण अपघात घडताना आरटीओ विभाग कदाचित आर्थिक देवाण-घेवाण करून निमुटपणे हा सगळा नरसंहाराचा चित्रपट निमुटपणे बघत आहे. सर्वसाधारण लोकांवर कारवाई करताना रेतीमाफीवर कारवाई करण्याचे धाडस आरटीओ विभागात उरले नाही. 

  1.           ‘त्या’ भामट्याचा झाला तिळपापड ….
  2.           19 मे रोजी लोणार महसूल अंतर्गत अवैध रेती वाहतूक करणारे वाहन तहसीलदार जोंधळे मॅडम यांनी पकडून दंडात्मक कारवाई सुरू असताना, रेती माफियातील तो भामटा मोठी गरळ ओकत होता. गिरगिट समान रंग बदलत असताना या भामट्याने पत्रकारांना फोटो तसेच व्हिडिओ चित्रित करण्यास मनाई केली. तहसीलदार मॅडम आमच्या आहेत आणि गाडी सुद्धा आमचीच आहे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ तथा फोटो चित्रीकरण करू नका अन्यथा परिणाम गंभीर होतील अशा प्रकारचा गर्भित इशारा या भामट्याने पत्रकारांना दिला. याचाच अर्थ रितीमाफियांचे लागेबांधे वैशाली जोंधळे तहसीलदार मॅडम यांच्याशी सुद्धा असल्याचे सिद्ध झाले आहे. हा सगळा प्रकार तहसीलदार जोंधळे मॅडम निमुटपणे ऐकत होत्या. परंतु त्या भामट्याच्या कोणत्याही धमकीला भीक सुद्धा पत्रकारांनी घातली नाही. त्याच्या उर्मट अर्वाच्यपणाची प्रचिती तेथे उभे असलेल्या अनेक नागरिकांनी बघितली होती. प्राप्ती माहितीनुसार हा भामट्या तेथील काही पत्रकार तसेच मंडळ अधिकारी तलाठी पोलीस स्टेशन यांना मॅनेज करणारा दलाल आहे. लोणार येथील रहिवासी असून स्वतःला डॉन समजण्याचा त्याचा गैरसमज आहे. लोकांना माझा भाऊ पत्रकार आहे मी कोणाला घाबरत नाही अशा प्रकारची धमकी देण्याची सुद्धा सत्कार्य हा भमटा करीत असल्याचे बोलले जात आहे.  
  3.       घटनास्थळावर या भामट्याने केलेल्या सर्व गैरवागणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण खोज मास्टरच्या टीमकडे आहे. दीड दमडीच्या या कथेत डॉनला कदाचित तहसीलदार मॅडमची चाटुगिरी करत मीडियाशी गैरवर्तणूक करणे याचे गंभीर परिणाम दिसले नाहीत. त्यामुळेच घटनास्थळी त्याचा मीडियाप्रती वागनुकीचा दाखला भविष्यकाळात त्याला निश्चित उचित फल देणार. 
  4. संपादक रमेश चव्हाण यांनी भ्रमणध्वनी वरून जालना जिल्हाधिकारी यांच्याशी केली चर्चा..
  5.            19 मे रोजी मंठा येथे जात असताना अचानक रस्त्यावर सुरू असलेल्या रेतीमाफीच्या ह्या प्रकरणात खोज मास्टर समूहाचे संपादक रमेश चव्हाण यांनी सुरू असलेल्या सर्व घटनाक्रम जालना जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता, जिल्हाधिकारी यांनी याबाबत नियमानुसार चौकशी करून संबंधितावर यथोचित कारवाई केली जाईल तसेच मंठा तालुक्यातील रेती घाटाची ईटीएस मोजणी करण्यात आली असून लवकरच याबाबत सुद्धा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. 
  6.                  जालना बुलढाणा जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक प्रकरणात शासनाचा मोठा महसूल बुडविला जात आहे, चोरट्या मार्गाने होणारी रेती वाहतूक बंद करण्यासाठी जालना बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नियमानुसार रेती वाहतूक करण्यासाठी रमेश चव्हाण जालना जिल्हाधिकारी कार्यालय समक्ष आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन त्यांनी जालना , बुलढाणा जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

लोणार मंठा तालुक्यातील रस्त्याची होत आहे चाळण…

      सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग मूग गिळून गप्प…

100 किलोमीटर प्रति तास सुसाट वेगात धावत असलेल्या ओव्हरलोड टिप्पर वाहतुकीमुळे लोणार मंठा तालुक्यातील रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक अपघातांना निमंत्रण या खड्ड्यामुळे दिल्या जात आहे. अपघाताची मालिका सुरू असून अनेक निष्पाप लोकांचा बळी सुद्धा यापूर्वी केलेला आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम वन विभाग याकडे निमुटपणे बघत आहे. शासनाचा कोट्यावधी रुपयाचा खर्च दरवर्षी रस्त्यावर बांधकामावर होत असतो. वनविभागाची ऱ्हास होऊ नये म्हणून त्यांचा सुद्धा कोट्यावधी रुपयाचा खर्च याच कामांमध्ये केला जात असतो. सुसाट वेगात वाहतूक करणाऱ्या या टिप्परचा कर्कश आवाज धूर रस्त्यावर उडणारी धूळ यामुळे लोणार अभयारण्यातील वन्यजीव पक्षी सुद्धा धोक्यात आले आहेत. याप्रकरणी संबंधित विभागाने संयुक्त कारवाई करत चोरटी अवैध रेती वाहतूक बंद करून महसूल विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे. 

रात्रीचा खेळ चाले…

महसूल अधिनियमानुसार कोणत्याही रेती घाटामध्ये संध्याकाळी सहा वाजेनंतर रेती उत्खनन वाहतूक करणे गुन्हा आहे. असे असताना सुद्धा शेकडो टिप्पर सवडद कानडी टाकळखुपा या क्षेत्रामधून प्रति उत्खनन वाहतूक करताना जोमात आढळून येत आहेत. अशा वाहनांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता ठोस कारवाई करत वाहन चालक मालक यांच्यावर महसूल नियमांतर्गत अवैध उत्खनन चोरी तसेच विनापरवाना वाहतूक अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल जर प्राप्त करायचा असेल तर बुलढाणा आणि जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक पत्रकार यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवावी अशी दोन्ही जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा

आहे.

0 9 4 9 0 9
Users Today : 81
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *