प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातूर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2024 च्या इयत्ता बारावीचा निकाल 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये पातुर येथील सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा 100 टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणे उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयमधून एकूण 58 विद्यार्थी विज्ञान शाखे मधून परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. या मधून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्यामुळे शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
सदर परीक्षेमध्ये विद्यालयातून 23 विद्यार्थी हे प्राविण्यश्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले तर 32 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये व 03 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यामधून कु. सृष्टी गजानन तायडे हिने 88.33 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरली आहे तर सुजल चंद्रशेखर सुगंधी याने 87.76 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कु.साक्षी नागेश टप्पे, कु. वैशाली भीमराव नागरगौजे या दोन विद्यार्थिनींनी 86.50 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी व पालकांचे कौतुक करून अभिनंदन केले. यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेच्या अध्यक्षा सौ सपना म्हैसणे, संस्थेचे सचिव श्री सचिन ढोणे, विद्यालयाचे प्राचार्य जे. डी. कंकाळ इतर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व आपल्या आई-वडिलांना दिले.