महाराष्ट्र हादरला! TV बघताना डाव साधला, सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, पोलिसांनी चक्रे फिरवली…

Khozmaster
2 Min Read

अकोला : अकोल्यात सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातल्या माना पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना घटना आहे. सहा वर्षीय चिमुकली ही शेजारच्या घरात टीव्ही पाहण्यासाठी गेली असता घरात कोणी नसल्याचे डाव साधत २० वर्षीय तरुणांने तिच्यासोबत अमानुषपणे कृत्य करीत अत्याचार केलाय. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. माना पोलिसांनी या प्रकरणात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करत अत्याचार करणाऱ्या तरुणालाही गजाआड केलंय. आदित्य कीर्तक असं या अत्याचार करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.अकोल्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालंय. जिल्ह्यातील मुतिजापुर तालुक्यातल्या एका गावात २० वर्षीय आदित्य अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. इतकेच नव्हे तर चिमुकलीसोबत अमानुष कृत्य देखील केले.माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज सुरोशे यांनी दिलेल्या माहितीनूसार, ठाण्याच्या हद्दीतीलच एका गावात सहा वर्षीय चिमुकली ही २३ मे रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गावातील युवकाच्या राहत्या घरी टीव्ही पाहायला गेली होती. त्यावेळेस येथील आदित्य नामक तरुणाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलाय. त्यानंतर मुलगी घरी परतली असता, तिने घडलेला हा प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला. हे सर्व ऐकून आई-वडिलांना धक्का बसला लागलीच त्यांनी तातडीने माना पोलीस स्टेशन गाठलं. आणि फिर्याद दिली यावरून कलम ३७६ पोस्कोअंतर्गत (बाल संरक्षण कायद्याअंतर्गत) तीन व चारनुसार गुन्हा दाखल केलाय. धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य केल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी तासाभरात गुन्हा दाखल करत राहत्या घरातून तरुणाला अटक केली. तरुणाला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सूरज सुरोशे खुद्द करीत आहेत.

अकोल्यात अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ

अकोल्यात लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. अनेक नवे प्रकरणं समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीचं एका तरुणीवर दोघांनी अत्याचार केला होता. विशेष म्हणजे पोलिसांकडून देखील तक्रार महिलांना शरीर सुखाची मागणी केल्याचे प्रकार समोर आले. हे अत्याचाराच्या प्रकरणं थांबायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे मुलींबरोबर महिलादेखील अकोल्यात असुरक्षित असल्याचं मागील दिवसांमध्ये घटलेल्या काही घटनांवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे अकोल्यात महिलांच्या, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *