गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी.
वार्ड क्रमांक ५ मध्ये सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे वार्ड क्रमांक ५
मध्ये नवीन डी.पी बसवावी नसता डी.पी वरील अतिरिक्त भार कमी करून वार्ड क्रमांक ५ मधील विद्युत ग्राहकांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करावा अशा मागणी मंठा येथील वार्ड क्रमांक ५ चे नगरसेवक दीपक आसाराम बोराडे यांनी केली आहे. मंठा येथील सहाय्यक अभियंता श्री भावसार साहेब म.रा.वी. वी कं. मंठा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांची लहा लहा होत.
असल्यामुळे व डी.पी सतत जळत असल्यामुळे वार्ड क्रमांक ५च्या नागरिकांना व विद्युत ग्राहकांना हा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे सदरील वार्डातील कमर्शियल ग्राहकांना स्वतंत्र डी.पी बसून त्यावरून विद्युत कनेक्शन दिल्यास सदरील त्रास कमी होईल आणि ग्राहकांना नियमित व सुरळीत विद्युत पुरवठा होईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर वार्ड क्रमांक ५ चे नगरसेवक दीपक आसाराम बोराडे भाजपा कार्यकर्ते तोफिक कुरेशी, दिनेश अंभोरे, इमरान भाई पठाण, यांच्यासह वार्ड क्रमांक ५ मधील विद्युत ग्राहकांच्या व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Users Today : 39