पुणे Porsche अपघात प्रकरणी मोठी अपडेट, ससूनच्या दोन डॉक्टरना अटक

Khozmaster
2 Min Read

 पुणे : पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी आता ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केलीय. आतापर्यंत या प्रकरणी सात जणांना अटक झालीय.

१९ मे रोजी झालेल्या अपघतात अभियंता तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत अल्पवयीन मुलगा कार चालवत होता. त्याच्या वडिलांसह आजोबांना याआधी अटक झालीय. आता ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहेत.

याबाबत समोर आलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट ससून रुग्णालयामध्ये पाठवले होते, परंतु ब्लड रिपोर्टच्या रिपोर्ट मध्ये फेरफार केले गेले आहेत असा आरोप डॉक्टरांवर करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरे यांना अटक केली आहे. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेले आहे. डॉक्टर श्रीहरी हरलोर यांना देखील अटक करण्यात आलेली आहे.

काय आहे पुण्यातील हिट अँड रन प्रकरण?
पुण्यात 19 मेच्या रात्री कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे कारने 2 आयटी इंजिनिअर तरुणांना चिरडलं होतं. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. यामध्ये एक मुलगा तर दुसरी मुलगी होती. या प्रकरणामधील बिल्डरच्या मुलाला 14 दिवस बाल कारागृहात ठेवण्यात आलं आहे. पोलिसांनी मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल आणि अपघात झाला त्यावेळी गाडीत असलेला ड्रायव्हर यांची एकत्र चौकशी होणार आहे.

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *