पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणी नगर भागात पोर्शे कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला (Kalyani Nagar Accident). अपघात झाला त्यावेळी ही कार पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा (Vishal Agarwal Builder) अल्पवयीन मुलगा मद्यपान करुन चालवत होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलाला अवघ्या 15 तासात बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर करुन त्याला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली. मात्र, या शिक्षेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, अल्पवयीन मुलाचा जामीन मंजूर करणं बाल न्याय मंडळाच्या (Juvenile Justice Board – JJB) सदस्यांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण या सदस्यांची चौकशी करा, असे आदेश महिला आणि बाल न्याय मंडळाचे आयुक्त प्रशांत नारनवरे (Prashant Narnaware) यांनी दिले असून त्यासाठी एक समिती देखील गठीत केली आहे.(Porsche Car Accident Pune)
स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती या प्रकरणाची पूर्णपणे पडताळणी करणार आहे. यासंदर्भातील अहवाल आयुक्त नारनवरे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलाला तात्काळ जामीन मंजूर करणं बाल न्याय मंडळातील सदस्यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे.
भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणारा कारचालक अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
म्हणून गुन्हा दाखल करताना त्याच्याविरोधात जामीनपात्र कलमं लावण्यात आली. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात त्याला जामीनही मिळाला. तसेच आरोपी कारचालकाने पंधरा दिवस येरवडा ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावं, दारु सोडवण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर त्याने 300 शब्दाचा निबंध लिहावा, भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास मदत करावी असं न्यायालयाने त्याला जामीन देताना सांगितलं. मात्र, न्यायालयाने सुनावलेली शिक्षा ऐकून सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
बाल न्याय मंडळाच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. दारु पिऊन रसस्त्यावर सुसाट कार चालवत दोघांचा
जीव घेणाऱ्या आरोपीला एवढ्या लवकर कसा जामीन मिळतो, त्याची चौकशी का केली जात नाही?
असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. यावरून बाल न्याय मंडळावर टीका होत होती.
आता या मंडळातील सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून सदस्यांची चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर आतापर्य़ंत जवळपास दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये विशाल अग्रवाल (मुलाचे वडील), सुरेंद्रकुमार अग्रवाल (मुलाचे आजोबा) Surendra Kumar Agarwal,
प्रल्हाद भुतडा Pralhad Bhutada (कोझी हॉटेलचा मालक – Cosie Pub Pune), सचिन काटकर Sachin Katkar
(कोझी हॉटेलचा व्यवस्थापक), संदीप सांगळे ( ब्लॅक बारचा मालक), नितेश शेवाणी (हॉटेल कर्मचारी),
जयेश गावकर (हॉटेल कर्मचारी), सरकारी रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील मुख्य डॉक्टर अजय तवारे
(Dr Ajay Taware), डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) , अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे.
Pune Porsche Car Accident Case | रक्त तपासणीपूर्वी डॉ. तावरे आणि अल्पवयीन आरोपीच्या वडीलांमध्ये नेमकं काय झालं?
Pune Porsche Car Accident Case | 2 तासात 14 कॉल…, पोर्शे कार प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी डॉक्टरवर असा आणला दबाव
UPI Payment | HDFC बँकेचा मोठा निर्णय, आता इतक्या रुपयांपेक्षा कमी असेल UPI व्यवहार तर येणार नाही SMS अलर्ट, जाणून घ्या
Cosie Pub PuneDr Ajay TawareDr Shrihari HalnorJuvenile Justice Board – JJBKalyani Nagar AccidentPorsche Car Accident PunePralhad BhutadaPrashant Narnaware
Users Today : 29