जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यात शेतकऱ्यांच्या २०० कोटीची लुट करणाऱ्यांचे लायसन्स रद्द करा..

KHOZ MASTER
1 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मुख्यमंत्र्यासह श्री कापसे जिल्हा कृषी अधिकारी जालना यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने २७ मे २०२४ रोजी निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे, तक्रारीत म्हटले आहे की जालना जिल्ह्यासह परतुर मंठा तालुक्यात फर्टीलायझर मालकाकडून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना M.R.P. पेक्षा ५०० ते ८०० रुपये अधिक भावाने कापसाचे कबाडी संकेत, सोयाबीन रुची इतर नामावंत ब्रॅण्डेड कंपनीच्या नावाखाली फर्टीलायझर मालक २०० कोटी पेक्षा अधिक काळाबाजार करणे चालू आहे, फर्टीलायझर मालक होलसेल डीलरशिप मिळाल्यानंतर सबडीलर डबल होलसेल करून फर्टिलायझर मालकाने तालुका कृषी अधिकारी यांना हाताशी धरून नियोजित कट रचून शेतकऱ्यांची लूटा लुट करत आहेत, हा खूप गंभीर विषय आहे शेतकऱ्यांसोबत होणारा दिवसाढवळ्या काळाबाजार लवकरात लवकर बंद झाला पाहिजे, फर्टीलायझर मालक व कृषी विभाग यांचे असे काळे धंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही, जालना जिल्ह्यात कृषी विभागाचे पथक फिरत आहे वसुलीसाठी का? कारवाई करण्यासाठी अद्याप एक पण कारवाई झाली नाही म्हणून, तसेच पूर्व कल्पना देऊन ४ जून नंतर आंदोलनाची तारीख जाहीर करून संबंधित परतूर मंठा तालुका कृषी अधिकारी, तसेच परतूर मंठा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा ही श्री सोळंके यांनी दिला आहे…

0 9 7 2 0 5
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *