गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर त्यांना महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याची जबाबदारी मिळताच त्यांनी मंठा शहरासाठी सुमारे 16 कोटी रुपये किंमत असलेली पाणीपुरवठा योजना मंठा नगरपालिकेला दिली असून सदरील योजनेसाठी असलेल्या धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असून धरणातून मंठा शहरातील नागरिकांच्या घराघरात पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्याची जबाबदारी मंठा नगरपालिकेतील नगराध्यक्ष नगरसेवक मुख्याधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची असल्याने देखील मंठा नगरपालिकेचा ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे आज मंठा शहरात पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांचे प्रचंड हाल होत असून पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून विहिरीवरून पाणी शोधून आणावे लागत आहे. टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. याबाबत अनेक नागरिकांनी राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या सूचनेनुसार भाजपा नेते कैलासराव बोराडे यांनी मंठा शहरात तीन टँकरद्वारे दररोज 36000 लिटर पाणी वाटप सुरु केले आहे.
यामुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून मंठा नगरपालिकेच्या गलथान कारभाराला कंटाळलो असल्याची प्रतिक्रिया मंठा शहरातील नगरसेवक एन डी दवणे लक्ष्मण बोराडे संजय काळे भागवत डाके गुलाब मामू संजय गायकवाड दीपक बोराडे यांनी दिली आहे.
नगरपालिकेच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे मंठा शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल
0
9
7
2
0
5
Users Today : 3
Leave a comment