अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार, दुप्पट दराने विक्री; कृषी विभागाकडून…

Khozmaster
2 Min Read

अकोला : जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणासाठी शेतकरी आक्रमक झाल्यानंतर बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे दुप्पट दराने विक्री होत असल्याच्या माहितीवरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. याप्रकरणी अश्विनी कृषी एजन्सीचे संचालक रामकृष्ण रामचंद्र पोहरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांचे नियोजन सुरू आहे. बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची लगबग दिसून येते. यंदा शेतकऱ्यांचा कापूस पिकाकडे ओढा आहे. कापसाचे बियाणे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. मागील चार दिवसांपासून शेतकरी पहाटेपासून कृषी केंद्रावर रांगा लावून बियाणे खरेदी करीत आहे. मात्र, पुरेसे बियाणे उपलब्ध होत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. शेतकऱ्यांना जादा उत्पादन देणारे तसेच पसंतीचे कपाशीचे पुरेसे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे अकोल्यात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. टिळक मार्गावर रास्ता रोको करीत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *