या खळबळजनक तक्रारीसंदर्भात बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे नरेंद्र ठाकरे यांच्याशी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींनी चर्चा केली. यावर ठाणेदार ठाकरे म्हणाले की, खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट बिलामंधून किती रुपयांचा घोटाळा झाला हे तपासातून समोर येईल. सध्या तपास सुरू आहे, या प्रकरणात आणखी काही घोटाळेबाज कर्मचारी आहेत का? हे उघडकीस येते का हे देखील पहावे लागणार असे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी सांगितले.