सलमान खान हत्याकट प्रकरणी आणखी एकाला अटक

Khozmaster
1 Min Read

वीन पनवेल : सलमान खान हत्येच्या कटाप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली. दीपक हवासिंग गोगालिया ऊर्फ जॉनी वाल्मीकी (३०, रा. ग्राम तिग्रणा ठाणा, भिवानी, हरियाणा) याला नवी मुंबई पोलिसांनी हरियाणातील भिवानी येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने १ जून रोजी अटक करण्यात आली.

सिने अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई व गोल्डी ब्रार गँगमधील अनेक साथीदारांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना दीपक हवासिंग गोगालिया ऊर्फ जॉनी वाल्मीकी हा पोलिसांच्या हाती लागला. त्याने या कटात बाहेरून येणाऱ्या आरोपींची राहण्याची व गुन्हा करण्यासाठी वापरणार असलेल्या वाहनांची व्यवस्था करणार होता. तो व्हिडीओ कॉलद्वारे कटातील आरोपीच्या संपर्कात होता.

पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी त्याच्या वास्तव्याबाबत भिवानी पोलिस अधीक्षक वरुण सिंघला यांनी माहिती कळविली असता त्यांनी हरियाणातील भिवानी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र व त्यांच्या पथकाच्या सहकार्याने जॉनी वाल्मीकी याला ताब्यात घेतले. रविवारी पनवेल शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद लभडे यांनी आरोपी जॉनीला भिवानी न्यायालयात हजर करून ५ जूनपर्यंत ट्रांझिट रिमांड मिळवला असून त्याला नवी मुंबईत आणले जाणार आहे.

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *