मुंबई : उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील (शिवसेना उबाठा) आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा (भाजप) या दोघांमध्ये ‘कांटे की टक्कर’ झाली. हा मतदारसंघ २०१४ च्या मोदी लाटेत भाजपच्या ताब्यात गेला आणि तो आजवर भाजपकडेच राहिला आहे. हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला आजवर जिंकता आलेला नव्हता. खासदारकीचा अनुभव असलेले पाटील पुन्हा बाजी मारणार, की कोटेचा भाजपची विजयी परंपरा कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
संजय दिना पाटील – ५६०३२, मिहिर कोटेचा – ४३७४४, संजय दिना पाटील १२२८८ ने आघाडीवर
संजय दिना पाटील – ४६७६७, मिहिर कोटेचा – ३०८५५, संजय दिना पाटील १५१९२ मतं घेऊन पुढे
सुरुवातीच्या कलांनुसार, शिवसेना उबाठा गटाचे संजय दिना पाटील आघाडीवर, मिहिर कोटेचा पिछाडीवरघाटकोपर पूर्व आणि पश्चिम, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, मानखुर्द शिवाजीनगर असे सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या या लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाचे भांडुपमधून रमेश कोरगावकर आणि विक्रोळीमधून सुनील राऊत हे दोन आमदार आहेत. घाटकोपर पूर्वमधून राम कदम, घाटकोपर पश्चिममधून पराग शाह आणि मुलुंडमधून मिहीर कोटेचा हे भाजपचे, तर मानखुर्द शिवाजीनगरमधून समाजवाटी पक्षाचे अबू आझमी आमदार आहेत.या मतदारसंघात मराठी मतदार साधारण चार लाख आहेत. गुजराती, मारवाडी मतदार पावणेतीन लाख असून त्यापाठोपाठ दोन लाख ७० हजार उत्तर भारतीय मतदार आहेत. मुस्लिम मतदारांची संख्या दोन लाख ६० लाख इतकी आहे. तसेच दक्षिण भारतीयांची संख्याही लक्षणीय आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांची भिस्त मराठी आणि मुस्लिम मतांवर होती, तरी अन्य मते मिळवण्यासाठीही त्यांना प्रयत्न करावे लागलेत.
| उमेदवार | पक्ष | विजय/पराभव |
| संजय दिना पाटील | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | |
| मिहिर कोटेचा | भाजप | |
| नंदेश उमप | बसप | |
| दौलत खान | वंचित बहुजन आघाडी |
२०१४ पासून उत्तर पूर्व मुंबईवर भाजपचे वर्चस्व राहिले होते. २००९ मध्ये मनसेच्या शिशिर शिंदे यांना मिळालेल्या सुमारे दोन लाख मतांमुळे भाजपच्या किरीट सोमय्या यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. सोमय्या हे चार हजार मतांनी पराभूत झाल्याने त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले संजय दिना पाटील निवडून आले होते. २०१४ च्या मोदी लाटेत सोमय्या यांनी पाटील यांचा तीन लाख १७ हजार १२२ मतांनी पराभव केला. त्यावेळी सोमय्या यांना पाच लाख २५ हजार २८५ मते मिळाली होती.
Users Today : 39