लिंबोना शिवारात सापडला अज्ञान व्यक्तीचा कुजलेले मृतदेह.

Khozmaster
1 Min Read
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा तालुक्यातील लिंबोना शिवारातील राजेभाऊ सोनाजी उकंडे यांच्या शेतात एका अज्ञान व्यक्तीचा मृत्यूदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मंठा तालुक्यातील    लिंबोना.
शिवारातील गट क्रमांक १६९ मध्ये अज्ञान व्यक्तीचे मृत्यूदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मंठा पोलिसांनी मिळाली त्यानंतर मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोलीस हवालदार राजू राठोड, पोलीस कॉन्स्टेबल मांगीलाल राठोड, मनोज काळे, आनंद ढवळे, पांडुरंग निंबाळकर, विजय तांगडे यांनी घटनास्थळी जाऊन सदरील प्रेतचा पंचनामा करून मंठा ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन साठी घेऊन आले. शवविच्छेदन करुन अंतिम संस्कारसाठी नगर पंचायतच्या ताब्यात दिल्याची माहिती पत्रकारांना दिली. सापडलेला व्यक्ती अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील असून व्यक्तीच्या अंगावर भूरकट रंगाची जीन्स आहे. कुजलेली व्यक्ती अंदाजे तीन ते चार दिवसा पूर्वीचे असावी अशी शक्यता पोलीसा कडून व्यक्त करण्यात आली आहे. तपास पोलीसउपनिरीक्षक बलभीम राऊत हे करीत आहे.
0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *