दहिगावात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायतीवर उभारली गुढी !

Khozmaster
1 Min Read
सरपंच सौ. मीराताई खरपास यांचा स्तुत्य उपक्रम
चिखली :-  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चिखली तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतीने दि. ६ जून रोजी  ग्रामपंचायत कार्यालयवर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भगवा झेंडा लावून आणि गुढी उभारून उत्सव साजरा केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिखली तालुका अध्यक्ष आणि दहिगाव सरपंचपती विनोद खरपास यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाभिमुख सरपंच सौ. मीराताई विनोद खरपास, ग्रामसेवक नंदकिशोर इंगळे, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयावर आणि गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोठा भगवा झेंडा फडकवण्यात आला आणि पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी सरपंच सौ. मीराताई खरपास यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून दिली आणि त्यांच्या शिकवणुकीवर प्रकाश टाकला. त्यांनी गावातील लोकांना एकात्मता आणि बंधुभाव दर्शविण्याचे आवाहन केले.
ग्रामसेवक नंदकिशोर इंगळे यांनी ग्रामपंचायतीच्या विकास कार्यांचा आढावा घेतला आणि पुढील काळात गावासाठी काय काय योजना राबवण्यात येणार आहेत याची माहिती दिली.
उपस्थित ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सरपंच मीराताई खरपास आणि  उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले.
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *