गावातील नागरिकांना राशन देण्यास राशन दुकानदाराचा नकार
अकोला प्रति – रामकृष्ण रामचंद्र लाळे रा. पडसो बढे रहीवाशी असुन त्यांच्या पत्नी सौ, छाया रामकृष्ण लाळे हयाचे नावाने लाळे कुटुंबाचे राशन कार्ड आहे, रामकृष्ण लाळे यांच्या कडे केसरी रंगाचे राशन कार्ड असुन त्याचा क्र. अनुक्रमांक ST. No. 1787155-असा आहे.पंरतु पडसो बढे येथील राशन दुकानदार दिनेश सुधाम ठाकरे यांचे दुकानामधून त्यांना स्वस्त धान्य मिळत असते. दिनेश सुदाम ठाकरे हे, अकोला येथे राहतात.पडसो बढे येथे राशन दुकानदार दिनेश ठाकरे राहतच नाहीत. त्यांचे फक्त घर व शेती पडसो बढे येथे आहे.स्वस्त धान्याच्या दुकानात प्रदिप चंदु गांवडे करतात, हे काम करतात प्रदिप गावंडे ह अर्धा पाउन तास दुकान उघडतात व बंद करतात. पडसो बढे येथील बहुतांश लोकांना राशन मिळत नाही. गावातील नागरिक येथील दुकानावर राशन आणण्याकरिता गेले असता, राशन संपले तुम्ही उशिरा आले असे सांगुन नागरिकांना परत पाठविले जाते. राशन दुकान मालक दिनेश सुदाम ठाकरे हे असुन राशन दुकानाचा सर्व कारभार दुकानात काम करणारा व्यक्ति प्रदिप गावंडे पाहतो. राशन घ्यायला गेलेल्या नागरिकांना उध्दटपणे बोलतो.
रामकृष्ण लाळे हे त्यांच्या पत्नीचे नावाने असलेले कार्ड घेउन ते दिनांक २९/०५/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वा सुमारास स्वस्त धान्य आणण्यासाठी गेले असता प्रदिप चंदु गावंडे हे स्वस्त धान्य दुकानात हजर होते, रामकृष्ण लाळे यांनी त्यांना प्रदिप चंदु गावंडे यांना मागील कोठ्याचे व तसेच चालू कोट्याचे राशन मागीतले असता लाळे यांना गावंडे यांनी राशन देण्यास नकार दिला. व तुम्हच्याने जे होईल ते करुन घ्या, असे म्हणाले. व त्यापूर्वि राशन दुकानदार दिनेश ठाकरे ला फोन केला असता, मालकाने तुम्हाला राशन मिळुन जाईल असे सांगितले. मात्र पुन्हा फोन लावला असता प्रदिप गावंडे यांचेच बाजुने राशन दुकानदार दिनेश ठाकरे बोलत होता व तुम्हाला राशन मिळणार नाही असेइतरांना राशन मिळणार नाही असे सांगुन फोन कट केला करिता मला व पडसो बढे येथील नागरिकांना राशन मिळण्याची व्यवस्था करावी,राशन दुकानाला स्वस्त धान्याचे दुकान अशी पाटी सुध्दा नाही. बहुतांश वेळा ही दुकान बंदच राहते म्हणून दुकानाची दररोजची उघडण्याची व बंद करण्याची वेळ निश्चीत करावी, व ग्राहकांना राशन का देव्यात येत नाही. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी. सदर व राशन दुकानदार व तेथील कर्मचारी यांची दादागिरी थांबवावी अशी मागणी पडसो बढे येथील नागरिक रामकृष्ण लाळे, रमेश वाहुरवाघ, रामकृष्ण ढवळे, पंकज ठोके, आशिष ठोके, मंगेश गवई , हिरालाल ढवळे, प्रविण लाळे, संजय गवई, विनायक लाळे, यांनी तहसीलदार अकोला व जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला, यांच्या कडे केलेल्या तक्रारी द्वारा केली आहे.
Users Today : 39