दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल कॉलेज ऑफ कॉमर्स अकोल्याच्या एन.सी.सी. विभागाच्या कॅडेट्सने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पथनाट्याद्वारे जनजागृती केली. ११ महाराष्ट्र बटालियनचे एन.सी.सी. अकोल्याचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाश भदोला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची व एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नेतृत्वाखाली या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या पथनाट्याद्वारे एन.सी.सी. कॅडेट्सनी पर्यावरणाचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पृथ्वी, वायू, जल, तेज, आणि आकाश या पंचतत्वावर आधारित हा निसर्ग. त्या निसर्गाचा समतोल मानवाने केलेल्या असंख्य चुकांमुळे ढासाळतोय आहे. वेळीच सावध झालो नाही तर येणारे संकट हे महाभयंकर राहील याची जाणीव करून देण्याकरिता वसुंधरेचे दुःख एन.सी.सी.कॅडेट्सने पथनाट्याच्या कलाकृतीतून सादर केले. कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी याप्रसंगी कॅडेटला मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. अशी भावना या पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये निर्माण व्हावी व पर्यावरणाविषयी त्यांचे प्रेम वाढावे ही यामागील संकल्पना आहे. या पथनाट्यामध्ये, कॅडेट हर्षा गायकवाड, कॅडेट उर्मिला बुंदेले, कॅडेट धनश्री दाणे, कॅडेट मानसी दळवी, कॅडेट प्राची वरुडकार, कॅडेट तनवी मालगन, कॅडेट श्रध्दा पांडे, कॅडेट सोकांश धवाने, कॅडेट त्रिशब कोकाटे, कॅडेट अविनाश वाकोडे, कॅडेट प्रविण सोळंकी, कॅडेट निखिल सभाधिंदे सहभागी होते. या पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी सार्जंट स्वराज बोदडे, कॉर्पोरल आदित्य वाकोडे, कॉर्पोरल धनश्री चव्हाण, कॅडेट सिमरन इंगळे, कॅडेट साक्षी झटाले, कॅडेट कल्याणी आमले, कॅडेट लक्ष्मी सुळे, कॅडेट नीतिक्षा पांडे, कॅडेट निवेदिता भोसले, कॅडेट लिना काळे, कॅडेट प्रेरणा गोतमारे, कॅडेट प्रेम अहिर, कॅडेट यशवंत हरसुलकर, कॅडेट नयन घुगे, कॅडेट रोहन मुरादे, कॅडेट मंथन गोलाईत, कॅडेट पवन गिरी, कॅडेट हर्ष देवगीकर, कॅडेट क्रिश करवाडिया या सर्व कॅडेटने परिश्रम घेतले. या पथनाट्याचे सादरीकरण करतांना महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.