नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतच्या कानशिलात लगावलेल्या CISF महिला जवानावर मोठी कारवाई

Khozmaster
1 Min Read

काल एका घटनेने सगळीकडे खळबळ माजली. ती म्हणजे नुकतीच खासदार झालेल्या कंगना रणौतला एअरपोर्टवर एका CISF महिला जवानाने कानशिलात लगावली. या घटनेची सर्वत्र खूप चर्चा झाली. कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या घटनेचा सविस्तर खुलासा केला.

आता याविषयी मोठी बातमी समोर येतेय. ज्या CISF महिला जवानाने कंगनाला मारलं तिच्यावर मोठी कारवाई झाली असून तिला सस्पेंड करण्यात आलंय.

कंगनाला कानशिलात लगावणारी महिला जवान बडतर्फ

१०० रुपये घेऊन लोक शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत, असं विधान कंगनाने केलं होतं. CISF महिला जवानाची आई शेतकरी आंदोलनात सहभागी झाली होती. कंगनाच्या विधानाने संतप्त झालेल्या महिला जवानाने तिच्या कानशिलात लगावली. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. कंगना त्यावेळी चंदीगढ एअरपोर्टवरुन दिल्लीसाठी रवाना होत होती. याचदरम्यान ही घटना घडली. कंगनाने याविषयी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी महिला जवान कुलविंदर कौरवर मोठी कारवाई करत तिला सस्पेंड केलंय.

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *