खड्डेच खड्डे! पहिल्या पावसातच नाशिक तुंबणार, पूर्वपावसाळी कामे करण्यात यंत्रणा अपयशी

Khozmaster
1 Min Read

नाशिक : पोलिस अधीक्षक बंगला ते टिळकवाडी सिग्नलपर्यंतच्या एकेरी रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर डांबरी बाजू व सिमेंटच्या बाजूच्या रस्त्यात एकप्रकारे खड्डा निर्माण झाला आहे. या उंचवट्यामुळे ऐन पावसाळ्यात काँक्रिटीकरण झालेल्या भागात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. परिसरातील आस्थापनांच्या पायऱ्यांची उंची अधिक आहे. त्यातच टिळकवाडी सिग्नल ते राका कॉलनी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झाल्याने समस्यांना निमंत्रण मिळाले आहे.सलग चार वर्षांपासून पहिल्या पावसातच नाशिक तुंबण्याचा प्रत्यत येत असूनही मान्सूनपूर्व कालावधीत रस्तेदुरुस्ती किंवा पूर्वपावसाळी कामे करण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे दिसते. ८ एप्रिलपासून सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या रस्त्यावरील पोलिस अधीक्षक बंगला ते टिळकवाडी सिग्नलपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाले. सिमेंटचा रस्ता करताना डांबरी रस्त्याची उंची अधिक राहिली असून, एकाच बाजूचे काम झाल्याने पावसाळ्यात तेथे पाणी साचण्याची शक्यता आहे.

पोलिसांच्या अधिसूचनेनुसार रात्री सोयीसाठी ‘ब्लिंकर्स’ बसविण्यात आले आहेत. मात्र, वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्याचे काम सुरू असताना दोन्ही बाजूने ‘ट्रॅफिक वॉर्डन’ असणे बंधनकारक आहे. परंतु, बऱ्याचदा तेथे ‘ट्रॅफिक वॉर्डन’ नसतात. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ होत असल्याचे दिसते. केवळ पत्र्याचे व लाकडी दांडक्याचे बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे. त्यामुळे एकेरी रस्त्यावरून दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *