जिया पाण्यात, जिशानचा घरी व्हिडिओ कॉल, काही वेळातच अनर्थ, जळगावच्या भावंडांचा रशियात मृत्यू

Khozmaster
3 Min Read

जळगाव: रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भावा-बहिणींचा व्हॉल्का नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजता घडली. हे दोघेही जळगावच्या अमळनेर येथील राहणारे होते. ते शिक्षण घेण्यासाठी रशियात गेले होते. एकाच वेळी घरातील दोन लेकरांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रशियात अमळनेर तालुक्यातील दोन भाऊ-बहीण एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते. यात जिया फिरोज पिंजारी (वय २०) व जीशान अशपाक पिंजारी (वय २०) दोन्ही राहणार अमळनेर, अशी या भाऊ बहिणींची नावे आहेत. याच घटनेत मंगळवारी भडगाव येथील हर्षल अनंतराव देसले (वय १९) याचाही मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री ते जेवण करण्यासाठी बाहेर पडले. व्हॉल्का नदीच्या किनारी त्यांनी थोडा वेळ घालवला तेथे जिया ही व्हॉल्का नदीत उतरली ते दाखवण्यासाठी जीशानने व्हिडिओ कॉल केला होता.

अश्फाक आणि त्यांच्या परिवाराने जियाला पटकन पाण्यातून बाहेर काढ, असं भलतं सलतं करू नका, म्हणून बजावले त्यावर जीशान हो म्हटला. मात्र, तेवढ्यात मोठी लाट आल्याने त्यांच्यासह पाच जण वाहून गेले. त्याच्यातील केवळ एक विद्यार्थिनी बचावली आहे. तिघे जिल्ह्यातील आहेत. रात्री साडेअकराच्या सुमारास ही माहिती पिंजारी कुटुंबीयांना कळविण्यात आली.

अश्फाक आणि त्यांच्या परिवाराला या दुर्घटनेबाबत माहिती देण्यात आली. त्यानंततर रात्री ते दिल्लीला गेले आणि तेथून ताश्कंदला ६ जूनला सायंकाळी सहाच्या सुमारास पोहोचले. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दूरध्वनीवरून अश्फाक व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले

चोपडा येथील डॉक्टर जुनेद अकबर पिंजारी यांची कन्सल्टन्सी आहे. त्या माध्यमातून गेल्या वर्षी त्यांनी भारतातून १४६ मुला-मुलींना रशिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवले होते. त्यात जिया व जीशानचाही समावेश होता. ते दोघे तेथील वैद्यकीय महाविद्यालय प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होते.

जियाचे वडील छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी कंपनी कामाला आहेत. जियाला एक भाऊ आहे. अश्फाक पिंजारी हे तालुक्यातील धार येथे शेतकरी आहेत. त्यांची पत्नी गृहिणी आहे. मोठी मुलगी डॉक्टर आहे. जिया ही अश्फाक पिंजारी यांची ही भाची आहे, पहिली ते दहावीपर्यंतचे तिचे शिक्षण येथील सेंट मेरी स्कूलमध्ये झालेले आहे.

दोन भाऊ बहिणींचा एकाच वेळी व्हॉल्का नदीच्या लाटेत बुडून मृत्यू झाल्याने परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. यामुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणाऱ्या भाऊ बहिणींचे स्वप्न अधुरेच राहिले.

जिल्हाधिकारी रशियाच्या दूतावासाच्या संपर्कात

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रात्री अकरा वाजता बळगाव तहसीलदारांना सूचना केली. रात्री बारा वाजल्यानंतर रशियाच्या दूतावासाच्या विनयकुमार यांच्याशी संपर्क केला. रात्री दीड वाजेच्या सुमारास घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर या युवकांसाठी मदत कार्य राबवण्याचे आवाहन केले. त्यानुसार, दुतावासाने संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना संपर्कासाठी यंत्रणा सज्ज केली. सकाळी सहा वाजेपासून जिल्हाधिकारी पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांच्या चौकशीसाठी संपर्कात होते. दुपारी माहिती अपडेट होताच भडगाव आणि अमळनेर तहसीलदारांची निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या स्थानिक पातळीवरील मदत कार्य राबवायला सुरुवात केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *