जळगाव-मुंबई विमानसेवेस १६ जून पासून होणार प्रारंभ, आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार सेवा

Khozmaster
2 Min Read

 जळगाव : भारत सरकारची अलायन्स एअर ही विमान कंपनी १६ जून पासून जळगाव-मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. या विमान कंपनीकडून सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस ही सेवा चालवण्यात येणार आहे. उड्डाण ५.० योजनेअंतर्गत जळगाव-मुंबई या विमानसेवेला नागरी उड्डाण मंत्रालयाकडून शुक्रवारी, ३१ मे रोजी हिरवा कंदील मिळाला होता. या सेवेबाबत डिजिटल बॅनर देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
उद्योजक, व्यापाऱ्यांसाठी जळगाव-मुंबई विमानसेवा फायदेशीर

जळगाव जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजकांना मुंबई येथे अनेकदा उद्योग व व्यापारासाठी मुंबईला जावे लागते. रेल्वे व ट्रॅव्हल्स यांचा प्रवास खर्चिक व जास्त वेळ घेणारा असल्यामुळे विमानसेवा सुरू करण्याबाबत उद्योजक व व्यापाऱ्यांकडून मागणी होत होती. या मागणीनुसार, जळगाव-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे.

लवकरच जळगाव-अहमदाबाद विमानसेवा होणार सुरू

मुंबईप्रमाणे गुजरात येथील अहमदाबाद मध्ये देखील उद्योग व व्यापार तसेच कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार, अलायन्स एअर कंपनीकडून जळगाव-अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार असून, याची लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांद्वारे माहिती मिळाली आहे.

जळगाव-मुंबई विमानसेवा १६ जून पासून सुरू होणार असून ही सेवा सुरुवातीला आठवड्यातून दोनदा चालवली जाणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून ही सेवा नियमित केली जाणार आहे. या विमानसेवेमुळे जळगाव व मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढवून व्यापार, उद्योग व पर्यटन यांना चालना मिळणार आहे. – सुनील कोठारी, अध्यक्ष, नागरी विमान वाहतुक समिती आणि औरंगाबाद पर्यटन विकास प्रतिष्ठान
0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *