दूषित पाणी देऊन मनाव अधिकाराचे उल्लंघन न. प. मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा.- डॉ. गोपाल बशिरे

Khozmaster
3 Min Read
लोणार येथील पाणी प्रश्न पेटला
ज्ञानेश्वर सुपेकर
 लोणार – लोणार नगरिषदेच्या  मुख्याधिकारी नगरवासीयांना नळ योजनेद्वारे दूषित,दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यास देऊन मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी विभागीय आयुक्त, निधी पांडे यांच्याकडे शिवसेना उ.बा.ठा. चे जिल्हा संघटक प्रा. डॉ. गोपाल बशिरे (बच्छिरे), यांनी केली.
नगरपरिषद लोणार येथील मुख्यधिकारी यांनी शहरास पिन्या जोगे स्वच्छ पाणी किमान आठवड्यातून एकदा देण्यात यावे या करिता डॉ.गोपाल बशिरे यांनी अनेक वेळा विनंत्या केल्या, निवेदने दिले, गजानन जाधव यांनी  मे २०२३ मध्ये आमरण उपोषणे केले तेव्हा मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन १० दिवसातून एकवेळा स्वच्छ व फिल्टर पाणीपुरवठा करूत असे लेखी आश्वासन देऊन सुद्धा मुख्याधिकारी यांनी जाणून बुजून किंवा त्यांना या विषयाचे गांभीर्य नसल्या कारणाने त्यांनी रीतसर या पाणी प्रकरणाकडे डोळे झाक केलेली आहे आणि त्यांच्या या कृतीमुळे पिवळ्या रंगाचे,  दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी कोणत्याही प्रकारचे फिल्टर न करता जसेच्या तसे धरणातून पाण्याच्या टाकीत व पाण्याच्या टाकीतून नळाला २० ते ३० दिवसातून एक वेळा शहरास नळ योजनेमार्फत सोडण्यात येत आहे जेव्हकी दि. १२ डिसेंबर २०२३ला न.प. ने पाठविलेले पाण्याचे नमुने अहवाल क्र.५७७९-८ दि.१७/१/२०२४ नुसार सदरील पाणी पिण्यास अयोग्य आहे असे मुख्य अणूजीव शास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांनी कळवले होते यांनी कळविले होते परंतु सदरील पाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता तसेच दूषित पाणी लोणार वाशीयांना पिण्यासाठी सोडतात
या कारणाने लोणार शहरातील शेकडो अल्पवयीन मुले वृद्ध हे डायरिया, पोटाचे विकार, व कावीळ सारख्या विकाराणे ग्रस्त झाले आहेत व यास कारणीभूत नगरपरिषद लोणारच्या मुख्याधिकारी ह्या आहेत त्यांनी जाणून बुजून सर्वसामान्य जनतेस पिवळ्या रंगाचे  दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी देऊन संविधान अनुच्छेद २१ म्हणजेच स्वच्छ पाण्याच्या संदर्भात मूलभूत अधिकाराचे हनन करून हजारो सजीव माणसांच्या जीवनाशी खेळत आहेत. करिता नगरपालिका लोणार मुख्याधिकारी यांच्या विरोधात संविधान अनुच्छेद २१ मधील पाण्याविषयीची मूलभूत अधिकाराचा उल्लंघन विरोधात व सर्वसामान्य हजारो लोकांना दूषित पाणी पिण्यासाठी देऊन त्यांच्या प्रानास धोका निर्माण  करून त्यांच्या जीवाशी खेळण्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नियमाने कार्यवाही करवी करिता फिर्याद मा निधी पांडे विभागीय आयुक्त यांच्याकडे एक तास चर्चा करून त्यांच्याकडे दाखल करण्यात आली त्यावर विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकारी श्री जोग यांना डॉ. गोपाल बशिरे यांच्यासमोर पाण्याचे नमुने घेऊन तपासणीस पाठवा असे आदेश दिले त्यानंतर कार्यवाही करूत जिल्हा उपाधिकारी जोग मुख्याधिकारी व यांच्यासमोर पोलीस स्टेशन समोरील भागातून नळातून येणाऱ्या पाण्याची नमुने घेतले व तेथील करून तपासणी बुलढाणा व संभाजीनगर या दोन ठिकाणी पाठवण्यात आले. याप्रसंगी बुलढाणा जील्हाऊपाधिकरी जोग, लोणार तहसीलदार गिरीश जोशी, लोणार न.पा. मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे, व शिवसेना उबाठाचे शहर प्रमुख गजानन जाधव, उपतालुका प्रमुख परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत नागरे, राजू बुधवत, श्रीकांत मादनकर, लूकमान कुरेशी, इक्बाल कुरेशी, तानाजी अंभोरे, तानाजी मापारी, अश्रूबा धारकर, राजू दहातोंडे, गणेश पाठे हे उपस्थित होते
बॉक्स-दूषित पाणी नळ योजनेद्वारे जनसामान्यांना देण्याच्या विरोधात लोणार नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करा विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बशीरे यांची मागणी.
0 9 4 9 2 3
Users Today : 95
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *