मोताळ्यात उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मूकनायक फाऊंडेशनतर्फे आयोजन
बुलढाणा : येथील मूकनायक फाऊंडेशनच्या वतीने मोताळा येथील पंचायत समिती सभागृहात ९ जून रोजी दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच समाजसेवक सतीश गुरचवळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला करण्यात येणार असून, ते ग्रंथ तरोडा येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेला देण्यात येतील.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मूकनायक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी निवृत्त केंद्रप्रमुख सुरेश जाधव, निवृत्त आरोग्य निरीक्षक चंद्रकांत धुरंधर, परमेश्वर गवई हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला डॉ. परेश जयस्वाल, डॉ. लकडे, समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गवई, ॲड. सुरडकर, ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव शिरसाठ, चंद्रकांत गवई, अशोक सरकटे, साहेबराव डोंगरे, सचिन हिरोळे, सुनीता वानखडे, रामराव गुरचवळे, निळकंठ वानखेडे, युवराज भिडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मूकनायक फाऊंडेशनच्या वतीने बालाभाऊ राऊत, अर्जून खरात, ॲड. कैलास कदम, सतीश गुरचवळे, सुनील सुरडकर, लाला गवई, विजय दोडे यांनी केले आहे.
मोताळ्यात उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
0
9
4
7
6
0
Users Today : 0
Leave a comment