जिल्ह्यातील 8 तलावांच्या लिलावाची कार्यवाही सुरू

Khozmaster
3 Min Read

बुलडाणा, दि‍. 07 : शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहिर केले आहे. त्यानुसार सन २०२३-२४ वर्षाकरिता, जिल्ह्यातील ५०० हेक्टरखालील ८ तलाव मुदत दि. ३० जून २०२४ रोजी संपत आहे. या तलाव, जलाशयाच्या निर्धारित कार्यक्षेत्रातील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना जिल्हास्तरीय तलाव ठेका समिती तलाव मासेमारी ठेका देणार आहे.

सन २०२४-२५ वर्षाचे तलाव ठेका प्रक्रियेकरीता अटी-शर्तीची पुर्तता करावी लागणार आहे. तलाव जलाशयावर नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना ही पुर्तता करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे. यासाठी संस्थेचा विहित नमुन्यातील मागणी अर्ज, संस्थेची एकुण सभासद संख्या व संचालक मंडळाची यादी, तलाव ठेका मागणीबाबतचा संस्थेचा ठराव, संस्था नोंदणी प्रमाणपत्र व उपविधीची प्रत, सहाय्यक निबंधक दुग्ध यांचे संस्था कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचे नोंदणी ना-हरकत प्रमाणपत्र, मागील तीन वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल, तीन वर्षाचे बैंक स्टेटमेंट, १० टक्के मत्स्यबीज संचयनाचा अगाऊ रक्कमेचा धनादेश, मागील तीन वर्षाचा संस्थेचा नफा-तोटा, अटी-शर्ती हमी, प्रतिवर्ष मत्स्यबीज संचयन व मत्स्योत्पादन अहवाल, तसेच मागील ५ वर्षे तलाव ठेका कालावधीचे पंचनामे सादर करणे आवश्यक आहे.

शासन निर्णयातील तरतूदीनुसार व अटी-शर्तीनुसार जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाचे तलाव ठेका मुदत ३० जून २०२४ रोजी संपुष्टात आलेले तलाव नव्याने मासेमारीसाठी ठेक्याने देण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतचा शासन निर्णय सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय (तांत्रिक), बुलडाणा येथे कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे, असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) सु. ग. गावडे यांनी कळविले आहे.

000000

सिंदखेड राजा तालुक्यात तीन टँकर मंजूर

बुलडाणा, दि‍. 07 : जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे तीन गावांना टॅकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दरेगाव, नागझिरी आणि शेंदुर्जन, ता. सिंदखेड राजा या तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानुसार दरेगाव, नागझिरी आणि शेंदुर्जन येथे प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या तीन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा यांनी कळविले आहे.

000000

आरटीओची वाहन तपासणी मोहीम

बुलडाणा, दि‍. 07 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. यात नियमानुसार नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहन तपासणी पथकाद्वारे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विना क्रमांकाची वाहने, वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने रस्त्यावर धावणारी वाहने, हेल्मेट परिधान न करता आढळून येणारी दुचाकी वाहने, तसेच फॅन्सी वाहन क्रमांक असणाऱ्या वाहनावर मोटार वाहन कायदा आणि नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

त्यामुळे वाहन चालविताना वाहन क्रमांक नियमानुसार असणे, वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवू नये. दुचाकी वाहने चालविताना हेल्मेटचा वापर करावा, फॅन्सी नंबरची वाहन चालवू नये. तसेच पालकांनी 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना गिअरची वाहने चालवायला देवु नये. याबाबत कारवाई करण्यात येणार आहे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी कळविले आहे.

0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *