छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातसह तालुक्यात बहुतांश मोलमजुरी करून खानारा व बेरोजगार शेतकरी नागरिक आहेत. यात मार्च एप्रिल मे महिन्यात इलेक्ट्रॉनिक बिल जास्तच येत असल्याने बिल भरणा शक्य होत नाही महावितरण कंपनीचे वरचेवर दर वाढत आहेत या महागाई च्या युगात विविध आवश्यक वस्तूचे भाव वाढल्याने जनता त्रस्त झाली आहे. यातच महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे विज दर आवाक्याच्या बाहेर गेल्याने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे. सदर,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने चालू आर्थिक वर्षात एक एप्रिल पासून विजेची दरवाढ केल्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सोयगावकरांचा खिशाला मोठा फटका बसत असून सर्वसामान्य,मजूरदार शेतकरी यांना वीज बिल परवडत नसल्याने त्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी होत आहे तर काही नागरिक पोटाला चिमटा देऊन केलेली कमाई वीज बिल
भरण्यामध्येच घालत आहेत त्यामुळे शासनाने वीज बिल कमी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
प्रत्येकाला हवी असणारी वीज युनिटची किंमत आवाक्याच्या बाहेर
पोहोचली असून यात वीज आकार
१०० युनिट पर्यंत ४ रुपये ७१ पैसे,
१०१ ते ३०० युनिट पर्यंत १० रुपये २९ पैसे, ३०१ ते. ५०० युनिट पर्यंत
१४ रुपये ५५ पैसे, ५०१ ते १ हजार
युनिट पर्यंत १६ रुपये ६४ पैसे तर १
हजार युनिटच्यानंतर १६ रुपये ६४
पैसे पर युनिट भरावे लागत आहेत.
त्या सोबतच वहण आकार एका
युनिटला एक रुपया सतरा पैसे,इंधन समायोजन आकार एका युनिटला ४० पैसे, वीज शुल्क जे की महाराष्ट्र शासनाला भरला जाणार टॅक्स १६ टक्के इतका असून या सर्व अंदाजे जवळपास दहा रुपये पर युनिट सर्वसामान्यांना वीज बिल भरावा लागत आहे. वीज वितरण कंपनीला तोटा होत आहे, याचा गाजावाजा महावितरण करीत आहे.
वितरण कंपनीतर्फे विजेची सेवा
देताना ज्या बाबींची दखल घ्यायला
हवी ती घेतली जात नसल्यामुळे
त्यांचा तोटा वाढतोय त्यापैकी
विजेची होणारी भरमसाठ चोरीवर
उपाय केला जात नाही. . लाईट दिवसेंदिवस राहत नाही आता पावसाळा सुरूवातीला काही दिवस बाकी परत वारा, गारा,अवकाळी पाऊस झाडे तुटली तारे तुटली म्हणुन लाईट प्रॉब्लेम सुरळीत लवकर होत नाही खूप काही समस्या निर्माण होतात याकरीता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विज दर कमी करावेत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तारे,डीपी किटक्याट विविध कामे दुरूस्त करून विज पुरवठा खंडित वारंवार होऊ नये याची दखल घ्यावी अशी सोयगाव तालुक्यातील जनतेतून चर्चा होत आहे.
Users Today : 7