छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त येथील पालिकेच्या सार्वजनिक वाचनालयात गुरुवार(ता,६)रोजी जेष्ठ नागरिक व जेष्ठ वाचक यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक सोहळा दिनाचा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करुन अभिवादन करण्यात आले, प्रभारी ग्रंथपाल गुलाबराव गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रथम जेष्ठ नागरिक ताराचंद जयसिंग राजपूत,पी,के,तळेकर,व ईश्वर शिंपी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून अभिवादन केले ,जेष्ठ साहित्यिक व जेष्ठ वाचक धोंडीरामसिंह राजपूत यांनी प्रथम ६जून,१६७४,रोजी झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची माहिती उपस्थिताना देऊन शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाची व शौर्य ची व लोकाभिमुख कार्याची
माहिती दिली, जेष्ठ नागरिक व वाचक कारभारी नवगिरे, भाऊसाहेब त्रिभुवन, पेंटर गणेश देशपांडे,सुभाष रावकर,दीपक काकडे,उदय सोनदे,विजय पडवळ,चांगदेव त्रिभुवन, यांनी ही छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला अभिवादन केले तसेच बबन क्षीरसागर,सुरेश संत,सुभाष चाफेकर व सुभाष आंबेकर यांचीही उपस्थिती होती,
शेवटी गुलाबराव गायकवाड यांनी आभार मानले.
Users Today : 7