केसांची जर योग्य काळजी घेतली नाही तर केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या अनेकांना होते. केसांमध्ये कोंडा झाला तर डोक्याच्या त्वचेवर धूळ-माती जमा होते. त्यामुळे केसगळतीची समस्या होते.
इतकंच नाही तर कोंडा झाल्याने केस खाजवतात सुद्धा. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही काही खास घरगुती उपाय करू शकता. यांनी तुमच्या केसांमधील कोंडाही दूर होईल आणि केसही मजबूत होतील. दह्याचा वापर करून तुम्ही केसांमधील कोंडा दूर करू शकता. चला जाणून घेऊ यासाठी दह्याचा कसा वापर कराल.
दह्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात जे केसांमधील कोंडा दूर करण्यास मदत करतात. याने डोक्याच्या त्वचेवर जमा झालेली धूळ आणि माती निघून जाते. दह्यामुळे डोक्याच्या त्वचेचं आरोग्यही चांगलं राहतं.
दही आणि लिंबाचा रस
Users Today : 0