अल्पवयीन मुलीवर दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार, तरुणाला अटक

Khozmaster
1 Min Read

मुंबई : पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला सोमवारी ओशिवरा पोलिसांकडून अटक करण्यात आली. आरोपी हा स्थानिक दुकानात काम करत असून त्याच परिसरात राहतो असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहते. ती ७ जून रोजी दुपारी काही खरेदी करण्यासाठी दुकानात गेली होती. तेव्हा आरोपीने तिला दुकानात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. नंतर मुलीने घरी गेल्यावर तिच्या आईला तिच्या गुप्तांगात वेदना होत असल्याचे सांगितले.

दरम्यान रविवारी, जेव्हा आई आणि मूलगी आरोपी ज्या दुकानात काम करतो त्या दुकानाजवळून जात असताना, मुलीने तिच्या आईला सांगितले की तिथे काम करणाऱ्या माणसाने तिच्यासोबत सदर प्रकार केला. ज्याने मुलीच्या आईला कथितपणे त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली मात्र नंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाला. महिलेने तिच्या पतीसह याप्रकरणी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.

पोलीस आरोपीचा शोध घेत असतानाच स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६,३७६(३),३७६(ए) ३७६(बी) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ६ आणि १९ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

0 9 4 7 7 5
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *