प्रेमसंबंधाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध, प्रियकराने भरस्त्यात प्रेयसीला संपवलं, फोटो व्हायरल होताच…

Khozmaster
2 Min Read

पालघर : भर रस्त्यात प्रेयसी आणि प्रियकर यांच्यात झालेल्या भांडणात प्रेयसीच्या डोक्यात दगडाने वार करून प्रेयसीची हत्या केल्याची घटना पालघर तालुक्यातील मुरबे परिसरात घडली आहे. स्नेहा चौधरी (वय २०) असे या घटनेतील मृत तरुणीचं नाव असून आरोपी प्रियकराला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे.पालघर तालुक्यातील मुरबे येथील सुमित नवनीत तांडेल (वय २३) आणि स्नेहा चौधरी (वय २०) हे दोघे रहिवासी असून त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. दोघेही तारापूर औद्योगिक वसाहती एका कंपनीत कामाला असल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास स्नेहा व सुमित मोटरसायकलवरून कामाला जाण्यासाठी निघाले. मात्र, अचानक सुमित याने मोटरसायकल कुंभवली परिसरात थांबवली भर रस्त्यातच या दोघांमध्ये यावेळी भांडण झाले. यावेळी आरोपी समितीने स्नेहाच्या डोक्यात दगडाने वार केल्याने स्नेहा जखमी झाली. स्थानिकांनी या दोघांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. तेथील स्थानिकांना ”स्नेहाला रुग्णालयात उपचारासाठी नेतो”, असे सांगून सुमित तिला एकलारे नजीक खाजण परिसरात घेऊन गेला.रस्त्यातच दोघांचे भांडण सुरू असल्याने आणि स्थानिकांना मुलाबाबत संशय आल्याने स्थानिकांनी भांडण झालेल्या दोघांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केले. हे फोटो स्नेहा चौधरीच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिचा शोध सुरू केला. या संपूर्ण घटनेची माहिती बोईसर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर स्थानिक व पोलिसांना एकलारे गावानजीक असलेल्या खाजण परिसरातील पाण्यात काल सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास स्नेहाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी बोईसर पोलिसांची पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात केली. आरोपी सुमित तांडेल प्रेयसीची हत्या केल्यानंतर घरी येऊन कपडे बदलून सातपाटी गावाच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सातपाटी परिसरातून सातपाटी सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी आरोपी सुमित तांडेल याच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहा चौधरी आणि सुमित तांडेल यांच्या प्रेमसंबंधाला स्नेहाच्या कुटुंबीयांचा विरोध होता याच रागातून भांडण होऊन सुमितने स्नेहाची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अधिक तपास बोईसर पोलीस करीत आहेत.

 

0 9 4 7 7 5
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *